आशिया चषक 2022 च्या सुपर-4 फेरीतील चौथ्या सामन्यात पाकिस्तानचा विजय 19 वर्षीय युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहने सुकर केला. नसीमने 9 गडी बाद झाल्यानंतर शेवटच्या षटकात सलग दोन षटकार मारून पाकिस्तानला विजय मिळवून दिला. याशिवाय आपल्या संघाला स्पर्धेच्या अंतिम फेरीतही पोहोचले. या विजयानंतर बोलताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नसीमच्या षटकारांमुळे आपल्याला पाकिस्तानचे दिग्गज फलंदाज जावेद मियॉंदाद यांची आठवण झाल्याचे म्हटले. त्यावर रवी शास्त्री यांनी देखील एक मोठा खुलासा केला.
सामन्यानंतर झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात बोलताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नसीमच्या षटकारांची तुलना जावेद मियॉंदाद यांच्या षटकाराशी केली. याच शारजा मैदानावर 1986 च्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात जावेद मियॉंदाद यांनी एका चेंडूत पाच धावांची आवश्यकता असताना चेतन शर्मांच्या चेंडूवर षटकार मारला होता. बाबर म्हणाला, “नदीमच्या दोन षटकारांनी आम्हाला जावेद भाईची आठवण करून दिली.” बाबरने असे म्हणतात क्षणी त्याची मुलाखत घेणाऱ्या समालोचक रवी शास्त्री म्हटले, “मी तिथेच होतो, मला आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.”
या सामन्यात सामनावीर ठरलेला पाकिस्तानचा अष्टपैलू शादाब खान याने देखील आपल्याला नसीमच्या षटकारांमुळे मियॉंदाद व शाहिद आफ्रिदी यांनी मारलेल्या षटकारांची आठवण झाल्याचे म्हटले. शारजा मैदानावर हृदयाची धडधड वाढवणारे बरेच सामने खेळले गेले आहेत. पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान हा सामना त्यापैकीच एक होता. शेवटच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी 6 चेंडूत 11 धावा हव्या होत्या. तर त्यांचा केवळ एकच खेळाडू बाकी होता. त्यावेळी आपल्या गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या युवा खेळाडूने शेवटच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार खेचून पाकिस्तानला आशिया कपच्या अंतिम फेरीत नेले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारताला विश्वचषक जिंकण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया अन् न्यूझीलंडला सामोरे जावे लागेल, वाचा T20WCचे सुधारित वेळापत्रक
पीएसएलच्या ‘फ्लॉप शो’ नंतर पाकिस्तानचा आणखी एक ‘पीजे’, पीसीबीने केली मोठी घोषणा
आशिया चषकात ‘या’ तीन चुका भारताला पडल्या महागात; जर टाळल्या तर टी-20 विश्वचषक आपलाच!





