भारतीय क्रिकेट संघाचे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक सध्या खूपच व्यस्त आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. तर दुसरीकडे हार्दिक पंड्या याच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यावर आयर्लंड आणि भारत संघाला २ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. रविवारपासून (२६ जून) या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आयर्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचे प्रशिक्षक असलेल्या व्हीव्हीएस लक्ष्मण यांना मोठा सल्ला दिला आहे.
शास्त्रींनी (Ravi Shastri) लक्ष्मण (VVS Laxman) यांना सल्ला देत (Ravi Shastri Advice To VVS Laxman) म्हटले आहे की, आयर्लंडविरुद्ध राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात यावे. यामुळे भारतीय संघाला चांगले परिणाम मिळू शकतात. ईएसपीएन क्रिकइंफोशी ते बोलत होते.
शास्त्री म्हणाले की, “जेव्हा राहुल खेळपट्टीवर असतो, तेव्हा धावफलक हालता राहतो. त्याच्याकडे मैदानातील चहूबाजूंना नेत्रदीपक फटके मारण्याची कमालीची आणि प्रशंसनीय क्षमता आहे. त्याचे सर्वात मोठे आणि उल्लेखनीय कौशल्य म्हणजे, तो विरोधी संघाच्या गोलंदाजांना घाबरवत नाही आणि आपला नैसर्गिक खेळ दाखवतो. त्यामुळे राहुलला आयर्लंडविरुद्धच्या टी२० सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये तिसऱ्या क्रमांकावर जागा देणे योग्य राहिल.”
३१ वर्षीय राहुल त्रिपाठीने गेल्या काही वर्षांमध्ये आयपीएलमध्ये आपल्या प्रदर्शनात सातत्य राखले आहे. त्याने आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्त्व करताना १४ सामन्यात १५८च्या स्ट्राईक रेटने ४१३ धावा केल्या आहेत. याच प्रदर्शनाच्या जोरावर त्याला आयर्लंडविरुद्ध भारतीय संघात निवडले गेले आहे.
परंतु राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळणे फार कठीण आहे. कारण सध्या भारतीय संघाकडे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. कर्णधार हार्दिक पंड्या आणि प्रशिक्षक लक्ष्मण संजू सॅमसन किंवा सूर्यकुमार यादव यांपैकी एकाला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवू शकतात. कारण या दोन्ही फलंदाजांकडे राहुलपेक्षा जास्त अनुभव आहे.
राहुलने अद्याप भारतीय संघाकडून पदार्पण केलेले नाही. अशात आयर्लंड दौरा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला वेगळे वळण देऊ शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हे फक्त पंतच करू शकतो..! रिषभने स्वत:च्याच विकेटचे केले सेलिब्रेशन, जडेजाला मारली मिठी
पतीपेक्षा पत्नी आहे एक पाऊल पुढे, आयर्लंडकडून क्रिकेट खेळणाऱ्या या जोडीबद्दल जाणून घ्या सर्वकाही