भारतीय संघाचे माजी दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग आणि हरभजन सिंग ओमानमध्ये २० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये (LLC) इंडिया महाराजा संघाकडून खेळतील. एलएलसी निवृत्त क्रिकेटपटूंची व्यावसायिक लीग आहे ज्यामध्ये तीन संघ सहभागी होतील. इतर दोन संघ आशिया आणि उर्वरित देशांचे आहेत. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री हे या लीगचे आयुक्त आहेत. सेहवाग, युवराज आणि हरभजन व्यतिरिक्त इंडिया महाराजा संघात इरफान पठाण, युसूफ पठाण, बद्रीनाथ, आरपी सिंग, प्रज्ञान ओझा, नमन ओझा, मनप्रीत गोनी, हेमांग बदानी, वेणुगोपाल राव, मुनाफ पटेल, संजय बांगर, नयन मोंगिया आणि अमित भंडारी यांचा समावेश आहे. संघांचा कर्णधार कोण असेल हे अद्याप ठरलेले नाही.
आशिया लायन्स नावाच्या आशियाई संघात पाकिस्तान आणि श्रीलंकेचे माजी दिग्गज शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी, सनथ जयसूर्या, मुथय्या मुरलीधरन, कामरान अकमल, चामिंडा वास, रोमेश कालुवितरना, तिलकरत्ने दिलशान, अझहर महमूद, उपुल थरंगा, मिसबाह-उल-हक, सनथ जयसूर्या. मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, मोहम्मद युसूफ आणि उमर गुल यांचा समावेश आहे.
अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असगर अफगाण देखील आशियाई संघाचा भाग असेल. तर, तिसऱ्या संघातील खेळाडूंची घोषणा अद्याप झालेली नाही. या संघात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज या संघांतील खेळाडूंचा समावेश असेल, असे मानले जात आहे. याबाबत अनेक माजी खेळाडूंशी चर्चा सुरू आहे.
लीगशी संबंधित एका पत्रकार परिषदेत रवी शास्त्री म्हणाले, “खऱ्या राजांप्रमाणे ते येतील, ते पाहतील आणि विजयी होतील. भारत, आशिया आणि उर्वरित जगातून दोन संघ चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. सेहवाग, युवराज आणि भज्जी आफ्रिदी, मुरली, चमिंडा, शोएब यांच्याविरुद्ध खेळतील तेव्हा चुरशीची लढत होईल. चाहत्यांसाठी हे मजेदार सामने असेल.”
ही लीग ओमान येथील आंतरराष्ट्रीय मैदानावर होईल. याच मैदानावर मागील वर्षी टी२० विश्वचषकातील पात्रता फेरीचे सामने खेळले गेले होते.
महत्त्वाच्या बातम्या-