भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नव्याने नियुक्त केलेल्या प्रशिक्षक रवी शास्त्रींना वर्षाला ७ करोड रुपये पगारची ऑफर दिली आहे. ही रक्कम भारताच्या मागील प्रशिक्षक अनिल कुंबळेना देण्यात आलेल्या रकमेएवढीच आहे. शास्त्रींचा पगार हा ७.५ करोड रुपयांपेक्षा जास्त नसेल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
शास्त्री जेव्हा कुंबळे च्या आधी भारतीय संघाचे दिग्दर्शक म्हणून काम करत होते तेव्हा त्यांना ७ ते ७.५ करोडची ऑफर दिली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशिक्षकच्या स्पोर्ट स्टाफला, म्हणजेच फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्रत्रक्षणाच्या प्रशिक्षकाला वर्षाला २ करोडच्या आसपास रक्कम पगार म्हणून मिळेल. जर फलंदाजी प्रशिक्षक म्हणून संजय बांगर आणि गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भरत अरुण यांना संधी मिळाली तर या दोघांना त्याच्या पगारामध्ये वाढ मिळेल.
या आधीच संजय बंगारने आपल्या आयपीएल संघ किंग्स इलेव्हन पंजाबच्या प्रशिक्षक पदाचा करार संपवला आहे आणि जर अरुण भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक झाले तर त्यांना ही आपला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बरोबरचा करार संपवावा लागेल.