भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवननं (Shikhar Dhawan) शनिवारी (24 ऑगस्ट) रोजी आश्चर्यकारकपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यावर भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी धवनला निवृत्तीनंतर शुभेच्छा दिल्या आहेत. शास्त्रींनी त्याच्यासाठी एक भावनिक संदेश लिहिला आहे.
धवनच्या निवृत्तीची घोषणा झाल्यापासून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma), इरफान पठाण (Irfan Pathan) आणि युवराज सिंग (Yuvraj Singh) या दिग्गज खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या. तर आता रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी माजी सलामीवीराला त्याच्या अधिकृत एक्स अकाउंटवर शुभेच्छा पाठवल्या आणि चांगल्या भविष्यासाठीही शुभेच्छा दिल्या.
रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले, “निवृत्तीचा आनंद घे, शिकलेल्या मुला! माझ्या 7 वर्षांच्या प्रशिक्षक आणि दिग्दर्शक म्हणून तु मला खूप आनंद आणि मनोरंजन दिले. आयसीसी टूर्नामेंट, आशिया चषक आणि सामनावीर खेळी सदैव स्मरणात राहील. तु अजूनही तरुण आहेस आणि गेममध्ये योगदान देण्याचे बरेच मार्ग आहेत. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.”
महत्त्वाच्या बातम्या-
दिग्गज गोलंदाज कोण? इंग्लंडच्या माजी कर्णधारानं दिली प्रतिक्रिया
पाकिस्तानच्या संघात मोठा फेरबदल, टी20 विश्वचषकासाठी ‘या’ खेळाडूच्या खांद्यावर नेतृ्त्वाची जबाबदारी
2024च्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याला केलं मुद्दाम ट्रोल, मोठं कारण उघडकीस