भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांच्यातील वादावर प्रतिक्रिया दिली. माध्यमांमध्ये सुरु असलेल्या रोहित-विराट यांच्यातील मतभेदांच्या अफवांना शास्त्रीं यांंनी नाकारले आहे. रोहित आणि विराट यांच्यात बिनसले असल्याच्या बातम्या बऱ्याच वेळा माध्यमांमध्ये प्रसारीत झाल्या होत्या. मात्र, मागील काही काळापासून दोघांमध्ये ताळमेळ बघायला मिळत होता. यावेळी परत एकदा त्यांच्या दोघातील नात्यात कटुता आल्याचे बोलले जात आहे. मात्र, आता यावर माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्या दोघात सर्व काही सुरळीत असुन आणि माध्यमांमुळे अशा अफवा पसरत आहे.
बीसीसीआयने 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रवी शास्त्री यांना भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आले होते. ते प्रशिक्षक असताना विराट कोहली संघाचा कर्णधार होता. रवी शास्त्री यांनी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील वादावर आपली प्रतिक्रिया दिली. शास्त्री म्हणालेे की त्यांच्याकडे अशा गोष्टींसाठी वेळ नाही. त्यांच्यामते माध्यमांसाठी हा केेवळ टाईसपास होता. विराट-रोहितच्या वादाच्या अफवेचे खापर माध्यंमांवर फोडले.
रवी शास्त्री एका यूट्यूब चॅनलशी बोलताना म्हटले की, “वो सब भाड में गया यार! तो सगळा तुमच्यासाठी टाईमपास होता. सर्व काही ठीक आहे. ते दोघे शतकीय भागीदारी करत आहेत आणि तुम्ही इकडे काहीही गोष्टी करत आहात. या सर्व माझ्यासाठी छोट्या गोष्टी आहेत आणि मी अशा गोष्टींवर वेळ वाया नाही घालवत.”
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात बऱ्याच काळापासून मतभेद असल्याच्या अफवा ऐकायला मिळत आहेत. मात्र या मागची सत्यता अजुनही पुढे आलेली नाही. अशातच रवी शास्त्री यांनी त्या दोघांमध्ये काहीही बिनसलेले नसल्याची प्रतिक्रिया दिली. (Ravi Shastri has revealed the truth about rumours of bitter relation between Virat and rohit)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंकेच्या ‘या’ खेळाडूवर झाली कठोर कारवाई, पंचांच्या निर्णयाचा केला होता अवमान
FIFA WORLD CUP: रोनाल्डोच्या पोर्तुगालला हरवत कोरिया सुपर-16 मध्ये! कमनशिबी उरूग्वे स्पर्धेबाहेर