भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक इच्छा व्यक्त केली आहे, ज्यामुळे बीसीसीआयच्या निवड समितीवर अप्रत्यक्षपणे प्रश्न उपस्थित होत आहेत. आयसीसी टी-20 विश्वचषक 2021नंतर शास्त्रींनी भारताचे मुख्य प्रशिक्षकपद सोडले. काही दिवसांपूर्वीच शास्त्रींनी संघाच्या निवड प्रक्रियेविषयी मोठे भाष्य केले होते. अशातच आता त्यांनी निवड समितीची बैठक लाईव्ह प्रसारित केली पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
रवी शास्त्री यांना 2017 साली पहिल्यांदाच भारताचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारले. त्यानंतर 2019 साली या पदावर त्यांची दुसऱ्यांदा नियुक्त केली गेली. 2021 टी-20 विश्वचषक संपल्यानंतर मात्रा त्यांना संघाचे प्रशिक्षकपद सोडले. राहुल द्रविड यानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. रवी शास्त्री () यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली होती की, भारताचा मुख्य प्रशिक्षक असताना त्यांना कधीही निवड समितीच्या बैठकीत बोलावले गेले नव्हत. या बैठकीत व्यवस्थापनाबाहेरील लोकांची उपस्थिती असायची, असेही शास्त्री म्हणाले होते.
एका वृत्तमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत शास्त्रींनी निवड समितीची बैठक थेट लाईव्ह घेण्याची मागणी केली आहे. शास्त्री या मुलाखतीत म्हणाले की, “निवड समितीची लाईव्ह मिटिंग पाहण्याचे माझे, स्वप्न आहे. निवड समितीची बैठक पाहणे खरोखर अद्भुत अनुभव असेल. हा निर्णय महत्वपूर्ण ठरू शकतो. पारदर्शकपणा हवा असेल तर हे होऊ शकते. तसेच बैठकीच्या ब्रॉडकास्टिंगनंतर त्याचे राईट्स विकले जाऊ शकतात. उत्पन्न वाढल्यामुळे निवडकर्त्यांनाही पाच पट अधिरक मोबदला मिळू शकतो. या गोष्ट खरोखर खास ठरू शकते आणि एक नवीन दृष्टीकोण देणारी ठरू शकते.”
दरम्यान, निवड समितीचे माजी अध्यक्ष चेतन शर्मा यांनी काही दिवासंपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला. एका स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकल्यामुळे चेतन शर्माना हे पद सोडावे लागले होते. अशात भारताचे माजी क्रिकेटपटू शिव सुंदर दास निवड समितीचे प्रभारी अध्यक्ष म्हणून कारभार पाहत आहेत. येत्या काळात बीसीसीआयला या जबाबदारीसाठी नवीन उमेदरावाराची गरज आहे. (Ravi Shastri has said that he wants to see the selection committee meeting live)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लखनऊने मुंबईला हरवल्यानंतर प्लेऑफसाठीची स्पर्धा अधिकच रोमांचक, जाणून घ्या कसे आहे समीकरण
पराभवानंतर रोहितचा राग उफाळला, ‘या’ खेळाडूंना ठरवले जबाबदार; लगेच वाचा