मागच्या काही दिवसांपासून विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद चर्चेत राहिला. सोमवारी (1 मे) लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामन्यादरम्यान वातावरण तापलेले होते. आरसीबीने हा सामना 18 धावांनी जिंकला. विराट आणि गंभीर यंच्यात आयपीएल इतिहासात दुसऱ्यांदा वाद झाला. या वादाची चर्चा अद्याप थांबली नाहीये. अशातच भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट आणि गंभीर यांच्यात मध्यस्थी करण्यासाठी तयारी दाखवली आहे.
रवी शास्त्री एका कार्यक्रमात बोलताना रवी शास्त्री (Ravi Shastri) विराट कोहली (Virat Kohli) आणि गंतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यातील वादाविषयी बोलले. शास्त्री म्हणाले की, “मला वाटते हा वाद एक किंवा दोन दिवसात शांत होईल. नंतर त्यांना वाटेल की, ही परिस्थिती खूप चांगल्या पद्धतीने हाताळता येऊ शकत होती. दोघेही एकाच राज्याकडून (दिल्ली) खेळतात आणि त्यांचा अनुभव मोठा आहे. गौतम गंभीर दोन विश्वचषकविजेता आहे, तर विराटही दिग्गज आहे. दोघेही दिल्लीकडून खेळतात. मला वाटते दोघांनी एकत्र बसून हा वाद कायमचा मिटवला पाहिजे. हाच सर्वोत्तम उपाय आहे.”
“जो कोणी हा वाद संपवण्याचा प्रयत्न करणार असेल, त्याने लवकरात लवकर हे करावे. कारण हा वाद अजून वाठावा अशी तुमची इच्छा नसेल की, वाद वाढावा आणि जगासमोर यावा. वाद असाच सुरू राहिला तर पुढच्या वेळी हे दोघे एकमेकांसमोर आल्यानंतर पुन्हा शाब्दिक वाद होतील. प्रकरण अधिक पेटूही शकते. एका वादातून दुसरा वाद सुरू होतो. त्यामुळे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर हा वाद मिडला पाहिजे. जर मला दोघांमध्ये मध्यस्थी करायची असेल तर मी देखील तयार आहे.”
दरम्या, विराट कोहली आणि गंतम गंभीर भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडू राहिले आहेत. दोघांनी देशासाठी अनेक सामन्यांमध्ये एकत्र प्रतिनिधित्व केले. पण आयपीएलमध्ये दोघांमध्ये वादाचा इतिहास राहिला आहे. आयपीएल 2013 मध्ये या दोघांची पहिली भांडणे झाली. त्यावेळी विराट रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा, तर गंभीर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार होता. या सामन्यात विकेट गमावल्यानंतर विराट पवेलियनमध्ये परतत असताना दोघांमध्ये वाद झाला. (Ravi Shastri is ready to mediate to settle the dispute between Virat Kohli and Gautam Gambhir)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीला सतत निवृत्तीबाबत विचारणे अयोग्य! सेहवाग म्हणाला, ‘त्याची शेवटची आयपीएल असेलही, पण…’
आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये चमकला वेगवान गोलंदाज, टॉप 5 खेळाडूंच्या यादीत ‘तो’ एकटाच भारतीय