प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला काही साध्य करायचे असेल तर त्यासाठी प्रथम उत्तम मार्गदर्शनाची गरज असते. मग ती गोष्ट पुढे जाऊन आपपल्या साध्य होते. आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपल्याला आपले आई-वडील, आपले गुरु, नातेवाईक किंवा मित्र मार्गदर्शक म्हणून सहकार्य करण्याचे काम करतात. असाच प्रसंग घडलाय, तो भारतीय संघाचे प्रशिक्षक ‘शास्त्री गुरुजी’ आणि त्यंचा ‘भारतीय संघातील शिष्यां’मध्ये.
गेले २-३ वर्षे रवी शास्त्री यांनी भारतीय कसोटी संघाला मजबूत करण्यासाठी खूप परिश्रम घेतले असून आज त्या कष्टाचे फळ दिसत आहे. भारतीय संघ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. याचे जास्त श्रेय जाते ते, रवी शास्त्री यांना.
भारतीय संघ गेली दोन वर्षे कसोटीमध्ये सुंदर प्रदर्शन करत आहे. न्यूझीलंड दौरा सोडल्यास बाकी सगळ्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला विजय मिळाला आहे. त्यामुळे भारतीय संघ आज विश्व कसोटीच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. दरम्यान, प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाबरोबर शास्त्रींनी भारतीय संघाला प्रेरणा देण्याचेही काम केले आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याची सुरुवात होण्यापुर्वी बीसीसीआयच्या ट्विटर हॅन्डलवरून प्रशिक्षक शास्त्री यांच्या मुख्य भूमिकेवर आधारित एक छोटासा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. बीसीसीआयद्वारे शेअर केलेल्या या व्हिडिओत शास्त्री ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पहिल्याच कसोटी सामन्यातील लज्जास्पद पराभवानंतर संघाला प्रेरणा देताना दिसत आहेत. याबरोबरच दमदार पुनरागमनानंतर ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर भाष्य करतानाही दिसत आहेत. तसेच या व्हिडिओत थोडक्यात भारतीय संघाचा गेल्या २ वर्षांचा विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेचा प्रवास दाखवला आहे.
The Big Day is here! 👏 👏
Get behind #TeamIndia & show your support as they take on New Zealand in #WTC21 Final in a few hours from now! 💪 💪 pic.twitter.com/8k9B74DMPg
— BCCI (@BCCI) June 18, 2021
शास्त्री यांचे मुख्य लक्ष्य आता विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना जिंकण्याचे आहे. शुक्रवारी (१८ जून) सुरु होणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघाने सामन्याच्या एक दिवसआधीच प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे. परंतु, अद्याप प्रतिस्पर्धी न्यूझीलंड संघाने त्यांचा अंतिम एकादशची घोषणा केलेली नाही. पहिल्याचा दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द झाल्यानंतर शनिवार रोजी (१९ जून) विनाअडथळा ठराविक वेळेनुसार सामना सुरु होईल की नाही? यावर क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी! आज रंगणार आहे तब्बल १० सामन्यांचा थरार, पाहा वेळापत्रक
जेव्हा पावसामुळे तब्बल १२ दिवस चालला होता कसोटी सामना, तरीही नव्हता लागला निकाल
दोघात तिसरा! पाऊस अन् भारत-न्यूझीलंड सामन्याचे जुने नाते, पाहा यापुर्वी कधी झालं होतं असं