भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आता आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तीन वर्षांपूर्वीच निवृत्ती घेतलेल्या धोनी सध्या केवळ आयपीएल खेळतो. 41 वर्षाचा धोनी यंदा आपला अखेरचा आयपीएल हंगाम खेळत असल्याचे सांगितले जातेय. असे असताना भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक व समालोचक रवी शास्त्री यांनी त्याच्या कसोटी निवृत्ती वेळच्या घटनेबाबत एक खुलासा केला आहे.
धोनी याने खूपच अकाली आपल्या कसोटी निवृत्तीची घोषणा केली होती. 2014 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तिसऱ्या कसोटीनंतर धोनीने अचानक निवृत्ती घेतलेली. तोपर्यंत धोनीने आपल्या कसोटी कारकीर्दीत 90 सामने खेळले होते. याच मुद्द्यावरून बोलताना शास्त्री म्हणाले,
“कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून धोनी आणखी दहा सामने तर निश्चितच खेळू शकला असता. 100 कसोटी खेळण्याचा एक मैलाचा दगड त्याच्यापासून अगदी जवळ होता. आपल्या चाहत्यांसमोर मनासारखी निवृत्ती त्याला घेता आली असती. मात्र, एक गोष्ट त्याने ठरवली की तो ती पुन्हा बदलत नाही. तो कधीही स्वतःसाठी खेळला नाही. त्याने दुसऱ्यांसाठी जागा रिकामी केली.”
धोनीच्या कसोटी कारकीर्दीचा विचार केल्यास त्याने 90 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये त्याने 38.09 च्या सरासरीने 4876 भावा केल्या होत्या. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने प्रथमच जागतिक कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानी पोहोचण्याची कामगिरी केलेली. धोनीने 2014 मध्ये कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर 2020 मध्ये वनडे व टी20 क्रिकेटला रामराम ठोकला. त्यानंतर आता तो केवळ आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. चालू हंगामानंतर तो आयपीएलमधूनही निवृत्त होण्याची दाट शक्यता आहे.
(Ravi Shastri Open Up On MS Dhoni Test Retirement)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लखनऊला घाम फोडणारा अथर्व तायडे आहे तरी कोण? अकोल्यात जन्म आणि दमदार आहे कारकीर्द
कॅप्टन राहुलच अपयश ठरतंय लखनऊच्या फायद्याचं! आयपीएल 2023 मधील ही आकडेवारी भन्नाट