सध्या इंडियन प्रीमियर लीग 2023 खेळली जात आहे. आयपीएल अंतिम टप्प्यात आली असून ही स्पर्धा संपल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने सामने असतील. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्यात हे दोन्ह बलाढ्य संघ एमेकांशी भिडणार आहेत. 7 ते 11 जूनदरम्यान हा सामना खेळला जाणार आहे. तत्पूर्वी आतापासून डब्ल्यूटीसीच्या या अंतिम सामन्याचे वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन निवडली आहे.
भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात सलग दुसऱ्यांदा खेळणार आहे. तर ऑस्ट्रेलियन संघ पहिल्यांत्याच डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात उतरणार आहे. इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ आपल्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह या सामन्यात उतरतील. भारतीय संघातील जसप्रीत बुमराह, रिषभ पंत, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे महत्वाचे खेळाडू दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नाहीत. पण तरीदेखील संघात अनेक दिग्गज असतील. रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अजिंक्य रहाणे यालाही संधी दिली आहे. रहाणेला संघात घेताना शास्त्रींनी त्याचे तोंड भरून कौतुक केले. आयसीसी रिव्यू शोमध्ये शास्त्री म्हणाले, “आयपीएलमध्ये रहाणे चेंडूला ज्या पद्धतीने टाइम करत होता आणि टी-20 क्रिकेट एका वेगळ्या पद्धतीने पाहत होता, हे कौतुकास्पद होते. तो धावांवर लक्ष देत नव्हता. आपण किती चेंडू खेळलो आहोत, याकडे त्याचे लक्ष होते. स्ट्राईक रेटवर त्याचे लक्ष होते.”
शास्त्रींच्या मते मागच्या वेळी भारतीय संघाने इंग्लंडमध्ये चांगले प्रदर्शन केले होते. पण तेव्हा जसप्रीत बुमराह संघात होता. यावेळी मात्र संघाला बुमराहची कमी जानवू शकते. शास्त्रींनी वेगवान गोलंदाजी आक्रमाणात यावेळी मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुर यांना निवडले आहे. वरच्या फळीत रोहित शर्मा, शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा खेळतील. चौथ्या क्रमांकावर विराट कोहली आणि पावच्या क्रमांकावर अजिंक्य रहाणे असेल. अष्टपैलू रविंद्र जडेजा आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विन या दोघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये शास्त्रींनी सामावून घेतले आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत केएस भरत खेळेल. (Ravi Shastri picks India’s playing XI for WTC finals, RCB duo get chance)
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी रवी शास्त्रींनी निवडलेली भारताची प्लेइंग इलेव्हन –
रोहित शर्मा (कप्तान), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, केएस भरत (विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी और मोहम्मद सिराज.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ईसीबीच्या करारातून मुक्त होणार इंग्लंडचा दिग्गज फलंदाज? लीग क्रिकेट खेळण्यासाठी 30 कोटींची ऑफर
विराटच्या नावाने चिडवणाऱ्यांना नवीन उल हकने केले शांत; म्हणाला, ‘गौतम गंभीर दिग्गजच…’