न्यूझीलंड आणि भारत यांच्यात रविवारी (27 नोव्हेंबर) हॅमिल्टन येथे मालिकेतील दुसरा वनडे सामना खेळला गेला. जो पावसामुळे रद्द झाला, यामुळे भारताच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना भारताने आधीच गमावला आहे. मात्र, या दोन्ही सामन्यांमध्ये युवा सलामीवीर शुबमन गिल याने उल्लेखनीय कामगिरी केली. त्याच्या याच कामगिरीतील सातत्याचे भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कौतुक केले.
मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले होते. या सामन्यात त्याने अर्धशतक साजरे केलेले. तर, पावसामुळे रद्द झालेल्या दुसऱ्या सामन्यात त्याने 45 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या या शानदार कामगिरीचे रवी शास्त्री यांनी तोंड भरून कौतुक केले. तसेच, तो भारतीय क्रिकेटचे भविष्य असल्याचे देखील म्हटले.
प्रसारण वाहिनीशी बोलताना शास्त्री म्हणाले,
“शुबमनला असे खेळताना पाहायला मला आवडते. त्याच्या फलंदाजीत काहीतरी वेगळे आहे. त्याचे तंत्र उत्कृष्ट असून तो बराच काळ भारतीय संघाचा सदस्य राहील. तो मेहनत करण्यास अजिबात कसूर ठेवत नाही. त्याला यशस्वी होण्याची भूक असून, त्याचे पाय अद्यापही जमिनीवरच आहेत.”
वनडे मालिकेतील शेवटचा सामना 30 नोव्हेंबरला क्रिस्टचर्च येथे खेळला जाणार आहे. तसेच या दौऱ्यात टी20 मालिका खेळली गेली. ज्यामध्ये भारताने हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली तीन सामन्यांची मालिका 1-0 अशी जिंकली. यामधीलही पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता आणि तिसऱ्या सामन्यात भारताची फलंदाजी सुरू होती तेव्हाही पावसाने खंड पाडल्याने सामना डकवर्थ लुईसच्या नियमानुसार बरोबरीत राहिला.
(Ravi Shastri Praised Shubman Gill)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुण्याची देविका घोरपडे स्पेनमध्ये चमकली! युवा बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकले गोल्ड
पाणी काढण्यासाठी सूर्या स्वतः उतरला मैदानात, व्हिडिओ होतोय व्हायरल