भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ फलंदाज अजिंक्य रहाणे सध्या आयपीएल 2023 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसून येतोय. संधी मिळालेल्या दोन्ही सामन्यात त्याने आक्रमक फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचे अनेक जण कौतुक करत आहेत. त्याचवेळी भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील अजिंक्यचे कौतुक करताना काही अनुभव सांगितले.
अजिंक्यच्या आयपीएलमधील सातत्यपूर्ण कामगिरीनंतर बोलताना शास्त्री एका क्रिकेट संकेतस्थळाशी म्हणाले,
“अजिंक्य रहाणे खऱ्या अर्थाने टीम मॅन आहे. मी त्याला खूप जवळून ओळखतो. त्याच्यासारखा संघाचे हित पाहणारा खेळाडू तुम्हाला दुसरा मिळणार नाही. तो बारावा खेळाडू म्हणून पाणी जरी देत असेल तरी इतरांना सूचना करतो. ड्रेसिंग रूममध्ये तो कोणाच्याही मदतीला नेहमीच तत्पर राहिला आहे. क्रिकेटचा खेळ कसा खेळावा तसेच खेळाविषयी किती प्रामाणिक असावे हे त्याच्याकडे पाहून समजते.”
राहणे याला आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने आपल्या ताफ्यात सामील करून घेतलेले. पहिले दोन सामने बाकावर बसल्यानंतर त्याला मुंबई इंडियन्सविरुद्ध पदार्पणाची संधी देण्यात आली. त्याने ही संधी साधत स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले. त्यानंतर राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात देखील त्याने 31 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
रहाणे सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तो याच फॉर्ममध्ये खेळत राहिल्यास जून महिन्यात होत असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी त्याचा भारतीय संघात विचार होऊ शकतो. श्रेयस अय्यर याच्या अनुपस्थितीत संघातील पाचव्या क्रमांकाची जागा रिकामी आहे. त्यामुळे अनुभवी रहाणेला या क्रमांकावर संधी मिळू शकते.
(Ravi Shastri Said Ajinkya Rahane Is Real Team Man)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गुडघ्याच्या दुखापतीची झगडतोय धोनी, तर ‘हा’ वेगवान गोलंदाज दोन आठवड्यांसाठी बाहेर : स्टीफन फ्लेमिंग
कोट्यावधी धोनी प्रेमी जमले एकत्र! सीएसके-राजस्थान सामन्यात शेवटच्या चेंडूवर घमासान