ऑस्ट्रेलिया संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यात भारताला 209 धावांनी पराभवाचा धक्का दिला. यासह भारतीय संघाचे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न आणखी लांबणीवर पडले. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाला हे विजेतेपद जिंकण्याची मोठी संधी होती. मात्र, भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव झाल. अशात आता समालोचक व भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.
भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री मागच्या काही महिन्यांपासून पुन्हा एकदा समालोचकाची भूमिका पार पाडत आहे. डब्ल्यूसीटी अंतिम सामन्यात देखील शास्त्री समालोचन करताना दिसले. रविवारी (11 जून) भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर माजी क्रिकेटपटू आणि जाणकाऱ्यांच्या प्रतिक्रियांचा अक्षरशः पूर आल्याचे दिसले. पण या सर्वांमध्ये शास्त्री यांची प्रतिक्रिया सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली.
या पराभवानंतर बोलताना शास्त्री म्हणाले,
“लोकांची ही चुकीची धारणा झाली आहे की, रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ आयसीसी स्पर्धा जिंकेल. मी तर म्हणेल की, आगामी वनडे विश्वचषकात भारतीय संघ उपांत्य फेरीपर्यंत देखील पोहोचणार नाही.”
दरम्यान बुधवारी (7 जून) सुरू झालेल्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारतासमोर विजयासाठी शेवटच्या डावात 444 धावांचे लक्ष्य ठेवले गेले होते. पण संघ शेवटच्या डावात 234 धावांपर्यंतच मजल मारू शकला. परिणामी ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी विजय मिळवला. तत्पूर्वी पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 469 धावा केल्या होत्या. भारताचा पहिला डाव 296 धावांवर गुंडाळला गेला होता. ट्रेविस हेड याने पहिल्या डावात 163 धावांची खेळी केलेली, ज्यासाठी त्याला सामनावीर म्हणून निवडले गेले.
(Ravi Shastri Said India Not Qualify For ODI World Cup Under Rohit Sharma Captaincy)
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या पराभवामागील खरे व्हिलन ‘हे’ 2 खेळाडू! नेटकरीही म्हणाले, ‘बीसीसीआयने त्यांना घेतलंच कशाला?’
WTC फायनलचा पराभव विराटच्या जिव्हारी, एक शब्दही न बोलण्याचा घेतला निर्णय; स्टोरी पाहून व्हाल भावूक