भारताचा फलंदाज विराट कोहलीचा फॉर्म हा क्रिकेटविश्वात मागील काही महिन्यांपासून ट्रेडिंग होत असलेला विषय आहे. त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर शतक करून १००० पेक्षा अधिक दिवस झाले आहेत. यामुळे त्याच्यावर चौफेर बाजूने टीका होत आहे. यामध्ये काही आजी माजी खेळाडूंचा समावेश आहे. त्यांनी विराटवर परखड शब्दांत त्याच्यावर टीका केली, तर काहींनी त्याची पाठराखण केली आहे. यातच भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी उडी घेतली आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी विराट कोहली (Virat Kohli) याच्या फलंदाजी बाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, “जर विराटने पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध अर्धशतक केले तर सगळ्यांची तोंडे बंद होतील.
शास्त्री हे स्टार स्पोर्ट्स ने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते, “सध्या विराटसोबत माझे बोलणे झाले नाही. त्याचा वाईट काळ एशिया कपपर्यंत मर्यादीत असेल, त्याला आता फॉर्ममध्ये परतण्यासाठी चांगली संधी आहे. अशातच त्याने जर पाकिस्तान विरुद्ध अर्धशतक केले जर लोकांची तोंडे बंद होतील. केवळ एक खेळी खूप अंतर तयार करते. विराटला फॉर्ममध्ये परतण्यासाठी एका खेळीची आवश्यकता आहे, कारण त्याची धावा करण्याची भूख काही संपली नाही. लोकांच्या आठवणी या कमी असतात. जे झाले ते आता इतिहासजमा आहे.”
विराटने २०१९मध्ये आंतरराष्ट्रीय शतक केले होते. त्यापासून तो क्रिकेटच्या सर्व प्रकारामध्ये धावा करण्यासाठी झगडत आहे. त्याच्या या वाईट फॉर्ममुळे भारतीय संघातील टी२०मधील त्याच्या स्थानावर प्रश्न निर्माण केले जात आहेत.
शास्त्री यांनी पुढे म्हटले, “असा कोणताच भारतीय क्रिकेटपटू नाही जो विराटपेक्षा फिट असेल. जर त्याने विचार पक्का केला तर तो कधीही फॉर्ममध्ये परतू शकतो आणि त्याला फॉर्ममध्ये परतण्यासाठी एका चांगल्या खेळीची वाट आहे.”
विराटने मागील काही काळापासून विश्रांती घेतली आहे. तो सध्या कुटुंबासोबत वेळ व्यतित करत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
थांबायचं नाय गड्या! पुजाराचे इंग्लंडमध्ये तिसरे वनडे शतक; संघाची धावसंख्या ४००
‘काही नाही त्याला ताप सुटलायं’, द्रविड कोरोना पॉजिटिव्ह चर्चांवर शास्त्री गुरूजींचे वक्तव्य
ऑस्ट्रेलियाच्या टी२० स्पेशालिस्टला करायचयं कसोटी संघात पुनरागमन; भारताबद्दल म्हणाला…