भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी अष्टपैलू हार्दिक पंड्या यांच्याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. हार्दिक त्याच्या कंबरेच्या दुखापतीमुळे सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. मागच्या वर्षी टी-२० विश्वचषकात त्याचे प्रदर्शन खूपच निराशाजनक होते आणि तो गोलंदाजी करू शकला नव्हता. यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये आगामी टी२० विश्वचषक खेळला जाणार आहे. शास्त्रींच्या मते यावर्षीच्या विश्वचषकात भारतीय संघाला ६ व्या क्रमांकावर एका अष्टपैलूची गरज आहे.
मागच्या वर्षीचा विश्वचषक यूएई आणि ओमानमध्ये खेळला गेला. या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रदर्शन खूप खराब राहिले. भारत पहिल्या ४ संघांमध्येही स्थान मिळवू शकला नाही. विराट कोहली मागच्या वर्षीच्या विश्वचषात भारताचे नेतृत्व करत होता, पण आगामी विश्वचषकात रोहित शर्मा संघाचा कर्णधार आहे. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे त्याचा फटका संघाला बसला होता. अशात आगामी टी२० विश्वचषकात (T20 World Cup-2022) संघाला एका नवीन आणि गुणवंत अष्टपैलू खेळाडूची गरज आहे.
इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले की, “मला वाटते की, अष्टपैलूची गरज ६ व्या क्रमांकावर नक्कीच आहे. पहिल्या पाच खेळाडूंमध्ये कोणीतरी असे पाहिजे, जो २-३ षटके गोलंदाजी करू शकेल, ज्यामुळे कर्णधारावरचा दबाव कमी होऊ शकतो. असे झाले, तर कर्णधाराला साडे सहा गोलंदाज मिळतात, ज्यातून तो निवड करू शकतो.”
“वेगवान गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण एक असे क्षेत्र असेल, ज्याला मी खूप जवळून पाहत आहे. मी फलंदाजीविषयी चिंतीत नाही. फलंदाज खूप आहे. पहिल्या पाच क्रमांकांवर चांगले फलंदाज आहेत. पॉवर हिटिंग आहे. जर कोणी ५ किंवा ६ क्रमांकानंतर खेळत असेल, तर त्याला अतिरिक्त विभागात खेळ दाखवावा लागेल. त्यामुळे भारतीय संघाव्यतिरिक्त गुजरात संघाच्या दृष्टीने हे खूप महत्वाचे आहे की, हार्दिकने २-३ षटके गोलंदाजी करावी.”
दरम्यान, हार्दिक पांड्या तोपर्यंत भारतासाठी चांगले प्रदर्शन करत होता, जोपर्यंत त्याच्या पाठीला दुखापत झाली नव्हती. दुखापतीनंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया केली गेली आणि बरेच दिवस तो मैदानातून बाहेर राहिला. मात्र, जेव्हा त्याने संघात पुनरागमन केले, तेव्हापासून अपेक्षित प्रदर्शन करू शकलेला नाही. आयपीएच २०२२ मध्ये हार्दिक गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याच्या प्रदर्शनावर सर्वांचेच लक्ष लागून असेल.
महत्वाच्या बातम्या –
‘आयपीएल २०२३मध्ये विराट होऊ शकतो…’, अनुभवी फिरकीपटू अश्विनचे हैराण करणारे वक्तव्य
मागच्या १ वर्षात ‘या’ ४ खेळाडूंनी सोडली नाही टीम इंडियाची साथ; तरीही आयपीएलमध्ये राहिले अनसोल्ड
आयपीएलच्या तीन नव्या नियमांचे रोहित शर्माकडून कौतुक, वाचा काय म्हणाला मुंबई इंडियन्सचा कर्णधार