---Advertisement---

‘द्रविडला एक महान संघ मिळाला आहे’, रवी शास्त्रींनी टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाबद्दल दिली मोठी प्रतिक्रिया

On: बुधवार, नोव्हेंबर 10, 2021 12:08 AM
Ravi-Shastri
---Advertisement---

सोमवारी(८ नोव्हेंबर) टी२० विश्वचषाकत भारताने त्यांचा शेवटचा सामना नामिबियाविरुद्ध जिंकला. या सामन्यानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींचा संघासोबतचा प्रवास संपणार आहे. शास्त्रींचा संघासोबतचा कार्यकाळ टी२० विश्वचषकानंतर संपणार होता. शास्त्रींनंतर आता संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. द्रविड त्यांच्या संघासोबतच्या अभियानाची सुरुवात १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मायदेशातील टी२० मालिकेने करणार आहे.

अशात शास्त्रींचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. शास्त्रींच्या मते द्रविडला वारशामध्ये एक महान संघ मिळाला आहे

शास्त्री द्रविडच्या प्रशिक्षक बनण्याबाबत बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, “राहुल द्रविडच्या रूपात त्यांच्याकडे एक अशी व्यक्ती आहे, ज्यांना वारशामध्ये एक महान संघ मिळाला आहे. मला वाटते की, त्यांच्या अनुभवाने ते येणाऱ्या काळात केवळ दर्जा वाढवू शकतात. येथ अजूनही असे खेळाडू आहेत, जे अजून ३-४ वर्ष खेळतील, जे खूप महत्त्वपूर्ण आहे. हा एका संघातील बदल नाहीय आणि यामुळे खूप फरक पडेल.”

“विराट अजूनही तोच आहे. त्याने संघाच्या नेत्याच्या रूपात चांगले काम केले आहे. तो मागच्या पाच वर्षांमध्ये कसोटी क्रिकेटचा सर्वात मोठा एंबेसिडर राहिला आहे. त्याला खूप सारे श्रेय जाते. ज्याप्रकारे तो विचार करतो, त्याला असे वाटते की, संघाला खेळ खेळायचा आहे आणि संघही त्याच्या अवतीभवती आहे,” असे शास्त्री पुढे म्हणाले.

दरम्यान, शास्त्री सुरुवातीला संघासोबत संचालकाच्या रुपात जोडले गेले होते. त्यांना २०१४ मध्ये इंग्लंड दौऱ्यापासून ते २०१५ च्या विश्वचषकापर्यंत संचालकाच्या रुपात नियुक्त केले गेले होते. त्यानंतर २०१६ मध्ये त्यांना या पदावरून हटवले गेले आणि ते एक वर्ष संघापासून लांब राहिले. २०१७ मध्ये शास्त्रींना पुन्हा संघासोबत सामील होण्याची संधी मिळाली. यावेळी त्याच्यावर मुख्य प्रशिक्षक पदाची मोठी जबाबदारी होती.

त्यानंतर शास्त्रींनी जवळपास ६ ते ७ वर्ष संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या कार्यकाळात संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सलग दोन कसोटी मालिका जिंकल्या. त्यांच्या प्रशिक्षकपदाच्या काळात भारतीय संघाचे एकंदरीत प्रदर्शन समाधानकारक होते, पण या दरम्यान संघाला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

विराट कोहलीने प्रशिक्षक रवी शास्त्रींना मिठी मारत दिला भावपूर्ण निरोप, व्हिडिओ व्हायरल

‘हिटमॅन’ची कमाल फिल्डींग! रोहित शर्माने सूर मारत पकडला अप्रतिम झेल, व्हिडिओ होतोय व्हायरल

नामिबियाविरुद्ध पंतने केली अशी काही कृती की चाहत्यांना आठवला यष्टीरक्षक धोनी, पाहा व्हिडिओ

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---