भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (virat kohli) मागच्या मोठ्या काळापासून खराब फॉर्मशी झगडत आहे. दक्षिण अफ्रिकेकडून कसोटी मालिकते भारतीय संघ पराभूत झाल्यानंतर त्याने कसोटी संघाचे कर्णधारपद देखील सोडले. आता भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि विराटचे खास सहकारी रवी शास्त्री (ravi shastri) यांच्याकडून विराटला एक मोलाचा सल्ला मिळाला आहे. शास्त्री यावेळी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (shoaib akhter) याच्यासोबत बोलत होते.
रवी शास्त्री यावेळी अख्तरसोबत बोलताना विराटला एक मोलाचा सल्ला देऊन गेले. त्यांच्या मते विराटने तीन महिने विश्रांतीवर गेले पाहिजे. शास्त्री म्हणाले की, “विराटला माहिती आहे की, तो ३३ वर्षाचा आहे. त्याच्याकडे अजून ५ वर्षाचे क्रिकेट शिल्लक आहे. जर त्याने शांत राहून त्याच्या फलंदाजीवर लक्ष दिले आणि फक्त एका सामन्याचा विचार केला, तर तो खूप काही करू शकतो. मला वाटते की, त्याने २-३ महिन्यांसाठी विश्रांतीवर गेले पाहिजे. विश्रांती त्याच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.”
“विश्रांतीनंतर विराट कोहली मानसिक रूपात ताजातवाना होईल आणि पुढच्या ३-४ वर्षांपर्यंत राजासारखा खेळेल. त्याचे विचार अधिक स्पष्ट होतील. त्याला माहिती आहे की, संघातील खेळाडूच्या रूपात त्याची काय भूमिका आहे. माझी इच्छा आहे की, विराटने एका खेळाडूच्या रूपात भारताला सामना जिंकवून द्यावा,” असे शास्त्री पुढे बोलताना म्हणाले.
विराटने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर इतरांप्रमाणे शास्त्रीही हैराण झाले होते. शास्त्री पुढे म्हणाले की, “मला वाटते विराटला कळले असावे की, बायो बबलमध्ये तिन्ही प्रकारांमध्ये कर्णधारपद सांभाळणे खूप कठीण आहे. कर्णधारपदामुळे तो विश्रांतीही घेऊ शकत नव्हता. टी२० आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडणे योग्य निर्णय होता. मात्र, त्याने जेव्हा कसोटी कर्णधारपद सोडले, तेव्हा मी खूप हैराण झालो. मागच्या पाच वर्षात त्याने भारताला क्रमांक एकचा कसोटी संघ बनवले आणि त्यामुळे कर्णधारपद सोडण्याला अर्थ नव्हता. असे असले तरी, शेवटी त्याच्या निर्णयाचा सन्मान करतो, कारण एका क्रिकेटपटूलाच माहिती असते की, त्याला काय वाटत आहे.”
दरम्यान, शास्त्रींनी सांगितल्याप्रमाणे विराटने भारताला एक सर्वोत्कृष्ट कसोटी संघ बनवले. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने सर्वाधिक ४० कसोटी सामने जिंकले. तसेच संघाला विदेशात कसोटी मालिका कशी जिंकायची, याचाही प्रत्यय दाखवला. विराटच्या नेतृत्वातील कसोटी संघाने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली.
महत्वाच्या बातम्या –
सलग ६० दिवस मॅरेथॉन धावण्याचा आशिष कासोदेकर यांचा जागतिक विक्रम
आयएसएल: ओदिशाविरुद्ध हैदराबादचा ऑग्बेचे केंद्रस्थानी
व्हिडिओ पाहा –