भारतीय संघाला विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाकडून 6 विकेट्सने पराभूत व्हावे लागले. यामुळे ऑस्ट्रेलिया 6 व्यांदा विश्वचषक विजेता बनला. या पराभवानंतर आठवडा लोटला असला तरी, या सामन्याची चर्चा अजूनही होत आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू व प्रसिद्ध समालोचक रवी शास्त्री यांनी या सामन्याबाबत प्रथमच माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
एका स्पर्धेच्या उद्घाटना समयी बोलताना शास्त्री यांना या अंतिम सामन्याविषयी विचारले गेले. त्यावेळी ते म्हणाले,
” जे झाले ते खरंच दुःखद होते. भारत हा स्पर्धेतील सर्वात मजबूत संघ होता. मात्र, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ अधिक मजबूत पद्धतीने खेळा. सचिन तेंडुलकर सारख्या महान खेळाडूला देखील विश्वचषक जिंकण्यासाठी सहा विश्वचषक वाट पहावी लागली. मला खात्री आहे की, आपण लवकरच विश्वचषक जिंकू.”
भारतीय संघाने आपला अखेरचा विश्वचषक 2011 मध्ये जिंकला होता. त्यानंतर सलग दोन विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला. तर या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताला पराभवाला सामोरे जावे लागले.
अंतिम सामन्याचा विचार केल्यास, भारतीय संघाने विराट कोहली व केएल राहुल यांच्या अर्धशतकांमुळे 241 धावा उभ्या केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 43 षटकातच सामना संपवला. भारतीय गोलंदाजांनी फक्त 47 धावांवर ऑस्ट्रेलियाच्या 3 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, त्यानंतर ट्रेविस हेड याने 137 धावांची शतकी खेळी व त्याला मार्नस लॅब्युशेन याने नाबाद अर्धशतक करून साथ दिल्याने ऑस्ट्रेलियाने सहा गडी राखून विजय मिळवला.
(Ravi Shastri Speaks On India Lost In ODI World Cup Final)
हेही वाचा-
IPL 2024: गुजरात टायटन्सचा कर्णधार बनताच शुबमन गिलची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘इतक्या चांगल्या…’
IPL ब्रेकिंग! पंड्या मुंबईकडे जाताच Gujarat Titansचे कर्णधारपद ‘या’ पठ्ठ्याकडे, उंचावतील तुमच्याही भुवया