काही दिवसांपूर्वी आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा माजी भारतीय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून शेवटची स्पर्धा ठरली. मुख्य प्रशिक्षकपद गेल्यानंतरही रवी शास्त्री काही ना काही कारणामुळे चर्चेत येत आहेत. नुकतेच त्यांनी सट्टेबाजीबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे.
भारतात सध्या सट्टेबाजी बेकायदेशीर आहे. भारतीय विधी आयोगाला २०१८ मध्ये खेळातील सट्टेबाजीला अधिकृत करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यात असेही म्हटले आहे की बीसीसीआयचे प्रयत्न “बेकायदेशीर आणि भूमिगत सट्टेबाजीच्या धोक्याचा सामना करण्यासाठी अप्रभावी आणि अपुरे आहेत”.(Ravi Shastri statement on betting)
लीगल फ्रेमवर्क: गॅम्बलिंग अँड स्पोर्ट्स बेटिंग इनक्लूडिंग इन क्रिकेट इन इंडिया, या शीर्षकाच्या अहवालात म्हटले आहे, ‘संपूर्ण बंदी लादण्यात अयशस्वी झाल्यामुळे बेटिंग वाढली आहे. यामुळे काळा पैसा वाढत आहे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहे. जर या गोष्टी पूर्णतः हटवता येत नसतील तर त्यांनी त्या लागू करणे योग्य निर्णय असेल.’
माजी भारतीय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विचारण्यात आले होते की, खेळ सट्टेबाजीबाबत तुमचे काय म्हणणे आहे. त्यावर बोलताना रवी शास्त्री स्पष्ट म्हणाले की, खेळ सट्टेबाजी कायदेशीर व्हायला हवी. त्यांनी म्हटले की, “इतर देशांना त्याचा प्रचंड फायदा होत आहे. ज्यामुळे सरकारची चांगली कमाई होत आहे. अधिकारी जितके थांबवू पाहतील, तितकीच ही गोष्ट वाढत जाईल. त्यामुळे सट्टेबाजी कायदेशीर करा.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “मला वाटते यामुळे सरकारची चांगली कमाई होऊ शकते. कर मिळवण्यासाठी हे दुसरे सर्वात मोठे स्थान आहे. माझे तर हेच म्हणणे आहे की, हे कायदेशीर झाले पाहिजे आणि योग्य मार्गाने पैसे कमवण्यासाठी हे एक चांगले व्यासपीठ आहे.”
महत्वाच्या बातम्या :
अविष्का फर्नांडोचा ‘फायनल धमाका’! जाफना किंग्स सलग दुसऱ्यांदा लंका प्रीमियर लीगचे ‘चॅम्पियन’
भारत-दक्षिण आफ्रिका क्रिकेट संबंधांना तीन दशके पूर्ण; दोन्ही बोर्ड करतायेत खास तयारी
हे नक्की पाहा: