भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका संपली आहे. मालिकेतील दोन्ही सामने भारताने जिंकले आणि श्रीलंकेला क्लीन स्वीप (२-०) दिला. कसोटी मालिकेत भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने अप्रतिम गोलंदाजी केली आणि स्वतःच्या नावावर अनेक विक्रम केले. अश्विनने श्रीलंकेविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये एकूण १२ विकेट्स घेतल्या आणि कसोटी क्रिकेटमध्ये स्वतःच्या ४४२ विकेट्स पूर्ण केल्या. तसेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अश्विन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे.
आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद (ICC World Test Championship) स्पर्धेचा दुसरा हंगाम सध्या खेळला जात आहे. या स्पर्धेत १०० विकेट्स पूर्ण करणारा रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) हा पहिला आणि एकमेव गोलंदाज बनला आहे. या यादीत अश्विनपाठोपाठ सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आहे, ज्याने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ९३ विकेट्स घेतल्या आहेत.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचाच दिग्गज स्टुअर्ट ब्रॉड आहे, ज्याने ८३ विकेट्स घेतल्या आहेत. टिम साउदी ८० विकेट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाचा जसप्रीत बुमराह ७४ विकेट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. नॅथन लायनच्याही ७४ विकेट्स आहेत आणि देखील पाचव्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, श्रीलंकेविरुद्धची ही कसोटी आणि टी-२० मालिका भारतीय संघासाठी खास ठरली. या दोन्ही मालिकांदरम्यन भारतीय खेळाडूंनी अनेक विक्रमांची नोंद केली. कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने भारतासाठी सर्वात वेगवान कसोटी अर्धशतक ठोकले.
तसेच अश्विनसह बुमराहने देखील अनेक विक्रम स्वतःच्या नावावर केले. अश्विनने दुसऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या या दोन्ही सामन्यांमध्ये प्रत्येकी ६-६ विकेट्स घेतल्या. याबरोबरच त्याने सर्वाधिक कसोटी विकेट्स घेण्याबाबत माजी दिग्गज कर्णधार कपिल देव आणि दक्षिण अफ्रिकन दिग्गज डेल स्टेनलाही मागे टाकले आहेत.
श्रीलंकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना १२ मार्चला सुरू झाला आणि तिसऱ्या दिवशी म्हणजचे १४ मार्चला (सोमवार) भारताने २३८ धावांनी विजय मिळवला. त्याआधी खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि २२२ धावांनी विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
विजयरथावर स्वार कर्णधार रोहितची वाढली डोकेदुखी! ‘हा’ विस्फोटक फलंदाज पहिल्या सामन्याला मुकणार?
रोहित शर्माचे रिषभ पंतबद्दल मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘काही क्षणात बदलू शकतो सामना, त्याला…’