भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील 2 सामने खेळले गेले. दोन्ही सामन्यात न्यूझीलंडने भारताचा धुव्वा उडवला आणि मालिकेत 2-0 ने आघाडी मिळवली. 12 वर्षांनंतर भारतात कसोटी मालिकेत भारताला पराभूत करणारा न्यूझीलंड पहिला संघ ठरला. आता दोन्ही संघातील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबई येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा अष्टपैलू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) इतिहास रचू शकतो.
वास्तविक, वानखेडे स्टेडियमवर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा गोलंदाज होण्यापासून रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) मात्र एक विकेट दूर आहे. न्यूझीलंडविरूद्ध होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात अश्विन हा रेकाॅर्ड आपल्या नावावर करू शकतो. सध्या वानखेडेवर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेण्याच्या बाबतीत अश्विनने दिग्गज भारतीय फिरकीपटू अनिल कुंबळेची (Anil Kumble) बरोबरी केली आहे. या दोघांच्या नावावर 38 कसोटी विकेट्स आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानी कपिल देव (Kapil Dev) आहे, ज्याने या मैदानावर 28 कसोटी विकेट्स घेतल्या आहेत.
वानखेडेवर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे गोलंदाज-
रविचंद्रन अश्विन- 38
अनिल कुंबळे- 38
कपिल देव- 28
हरभजन सिंग- 24
करसन घावरी- 24
महत्त्वाच्या बातम्या-
इलेक्ट्रिशियनची मुलगी क्रिकेटचं मैदान गाजवायला सज्ज! कोण आहे भारताची पदार्पणवीर प्रिया मिश्रा?
भारतीय महिला संघाचा लाजिरवाणा पराभव, न्यूझीलंडने सर्वबाद करत मोठ्या अंतराने जिंकली दुसरी वनडे
“स्वत:ला राजा समजलो…” कर्णधार झाल्यानंतर मोहम्मद रिझवानचे मोठे वक्तव्य!