भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी 9 फेब्रुवारी रोजी सुरू होईल. मालिकेतील पहिला कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियवर आयोजित केला गेला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य संघांमधील संघर्ष पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. यातही खास लक्ष असेल ते म्हणजे फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याच्यावर. अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात अवघी एक विकेट घेतली, तर त्याच्या नावावर मोठा विक्रम नोंदवला जाईल.
ऑस्ट्रेलियन संघ फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) स्पर्धेसाठी भारतात दाखल झाला आहे. उभय संघांतील हा पहिल्या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. अश्विन पहिला सामना खेळला आणि त्याने एक विकेट घेतली, तर भारताचे माजी दिग्गज अनिल कुंबळे यांचा मोठा विक्रम मोडीत निघेल.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद (सामन्यांच्या बाबतीत) 450 विकेट्स घेण्याचा विक्रम श्रीलंकन संघाचा माजी फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) याच्या नावावर आहे. मुरलीधरनने कसोटी कारकिर्दीतील 80 व्या सामन्यात 450 विकेट्स घेण्याची कमाल केली होती. त्यानंतर या यादीत दुसरा क्रमांक येदो अनिल कुंबळे (Anil Kumble) यांच्या. कुंबळेंनी कारकिर्दीतील 93 व्या कसोटी सामन्यात 450 विकेट्स पूर्ण केल्या होत्या. रविचंद्रन अश्विन 450 विकेट्सच्या अगदी जवळ पोहोचला असून आता कुंबळेंच्या विक्रमाला धोका निर्माण झाला आहे. अश्विनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत 88 सामने खेळले आहेत आणि यात 449 विकेट्स घेतल्या आहेत. अशात अजून एक विकेट घेतल्यानंतर अश्विन 89 व्या कसोटी सामन्यात 450 विकेट्स पूर्ण करू शकतो आणि खास यादीत कुंबळेंना मागे टाकत दुसरा क्रमांक देखील मिळवून शकतो.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यांमध्ये 450 विकेट्स घेणारे गोलंदाज
मुथय्या मुरलीधरन – 80 कसोटी सामन्यांमध्ये
अनिल कुंबळे – 93 कसोटी सामन्यांमध्ये
रविचंद्रन अश्विन – (ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत म्हणजेच कारकिर्दीतील 89 व्या सामन्यात संधी)
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी निवडलेला भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकत, सूर्यकुमार यादव. (Ravichandran Ashwin can make a big record in the first Test match against Australia)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘टी20त ईशानला ड्रॉप करून पृथ्वी शॉला खेळवा’, म्हणत विश्वविजेत्या भारतीय दिग्गजाने कारणही सांगितलं
तिसऱ्या पंचांच्या विचित्र निर्णयाने चाहतेही हादरले, बीबीएलमध्ये घडलेला प्रकार होतोय व्हायरल





