एजबॅस्टन येथे सुरू असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील अखेरच्या दिवसाचा खेळ संपन्न झाला. भारतीय संघाने संपूर्ण दिवसभर वर्चस्व गाजवत या ऐतिहासिक अंतिम सामन्यात आपले पारडे जड केले. भारतीय गोलंदाजांना प्रथम कामगिरी करत न्यूझीलंडचा पहिला डाव २४९ धावांवर संपविला. न्यूझीलंडच्या डावातील दोन बळी घेत भारताचा प्रमुख फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने एका खास विक्रमाची नोंद केली.
अश्विनने मिळवले दोन बळी
भारतीय संघ या कसोटीच्या पहिल्या डावात अवघ्या २१७ धावांवर सर्वबाद झाला होता. त्यानंतर न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी संयमाने फलंदाजी करत ३४ षटकात ७० धावांची सलामी दिली. भारताचा प्रमुख फिरकीपटू असलेल्या रविचंद्रन अश्विनने टॉम लॅथमला विराट कोहलीच्या हाती झेल देण्यास भाग पाडत, भारताला पहिले यश मिळवून दिले. अश्विनने पाचव्या दिवशी पुन्हा एकदा आपल्या फिरकीची कमाल दाखवत न्यूझीलंडचा नवव्या क्रमांकावरील फलंदाज नील वॅग्नर याला खाते ही खोलू न देता स्लिपमध्ये अजिंक्य रहाणेकरवी झेलबाद केले.
अश्विनचा नवा विक्रम
रविचंद्रन अश्विनने वॅग्नरला बाद करताना एका खास यादीत आपले नाव समाविष्ट केले. रविचंद्रन अश्विन एकाच कर्णधाराच्या नेतृत्वात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसर्या क्रमांकावर आला. अश्विनने २०१४ पासून कसोटीमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात २८१ बळी मिळवले आहेत.
या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या ग्रॅमी स्मिथच्या नेतृत्वात तब्बल ३४७ कसोटी बळी मिळवले होते. एकाच कर्णधाराच्या नेतृत्वात सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तिसऱ्या स्थानी देखील दक्षिण आफ्रिकेचाच मखाया एन्टिनी आहे. त्याने देखील ग्रॅमी स्मिथच्याच नेतृत्वात २८० बळी घेण्याची किमया केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
केन विलियम्सनचं अर्धशतक हुकलं, पण स्टिफन फ्लेमिंगला मागे टाकत केला ‘मोठा’ विक्रम
व्हिडिओ: भारताचे ‘सेफ हॅन्ड’ अॅक्शनमध्ये! रहाणेने स्लिपमध्ये घेतला अप्रतिम कॅच
नया हैं यह! शमीने भर मैदानात गुंडाळला टॉवेल, चाहत्यांच्या आल्या ‘अशा’ प्रतिक्रिया