जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताला 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. अंतिम सामन्यात भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर होता. अश्विनला खेळण्याची संधी न दिल्यामुळे संघ व्यवस्थापन आणि कर्णधारावार चांगल्याच टिका झाला. अजूनही चाहत्यांच्या मनातील रोष कमी झाला नाहीये. अशातच अश्विनने स्वतः देखील याविषयी नाराजी व्यक्त केली की, त्याला डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात खेळता आले नाही.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2021-23 (WTC) मध्ये रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin ) भारतीय संघाचा महत्वाचा भाग ठरला. त्याने विदेशात केलेले प्रदर्शन संघासाठी खरोखर फायदेशीर ठरले. भारताला डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवण्यात अश्विनची भूमिका महत्वाची राहिली असली, तरी शेवटच्या क्षणी मात्र संघ व्यवस्थानाने त्याच्यावर अविश्वास दाखवला आहे. भारतीय संघ या सामन्यात चार वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरला, पण ही रणनीती कामी येताना दिसली नाही. अश्विनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी नाराजी व्यक्त केली.
अश्विन म्हणाला, “मी या अंतिम सामन्यात नक्कीच केळू इच्छित होतो. कारण संघाला इथपर्यंत पोहोचवण्यात माझेही योगदान राहिले आहे. मागच्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात मी चांगली गोलंदाजी करत चार विकेट्स घेतल्या होत्या. 2018-19 नंतर विदेशी धरतीवर माचे प्रदर्शन देखील चांगले राहिले आहे. मी संघासाठी मॅच विनिंग प्रदर्शन केले आहे. कर्णधार आणि प्रशिक्षकाच्या दृष्टीने मी या गोष्टी (प्लेइंग इळेव्हनमधून वगळणे) समजून घेण्याच्या प्रयत्न करत आहे. आम्ही याआधी इंग्लंडमध्ये खेळलो, तेव्हा कसोटी मालिका 2-2 अशा बरोबरीवर सुटली होती. त्यावेळी संघाला असे वाटते असावे की, इंग्लंडमध्ये जिंकण्याचे गणित चार वेगवान गोलंदाजांसह खेळणे आहे. शक्यतो डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यातही त्यांना असाच विचार केला असावा.”
दरम्यान, अश्विन या सामन्यात प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर बसवल्यामुळे सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर अशा काही दिग्गजांनी निराजी व्यक्त केली. याविषयी देखील अस्विन व्यक्त झाला. “मला चांगले वाटले की त्यांनी (सचिन, गावसकर) माझ्याविषयी असा विचार केला. पण ला खेळण्याची संधी आणि विश्वचषक जिंकण्याची संधी मिळाली नाही, हेच सत्य आहे. सामन्याला 48 तास बाकी असताना समजले की, मी हा सामना खेळणार नाहीये. माझा प्रयत्न हाच होता की, संघाला विश्वचषक मिळवून देण्यासाठी शक्य ती प्रत्येक मदत करेल. कारण आधीही मी असे केले होते.” (Ravichandran Ashwin is upset about not getting a chance to play in the WTC final)
महत्वाच्या बातम्या –
भारतीय संघाने रचला इतिहास! ‘या’ खेळात पहिल्यांदाच मिळवली सेमीफायनलमध्ये जागा
‘तुझ्यामुळे भारत विश्वचषक जिंकत नाहीये’, ट्रोलरने आकाश चोप्राला केले ट्रोल, म्हणाला, ‘मी घेतो जबाबदारी’