अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने अप्रतिम खेळी करत संघाची धावसंख्या 480 धावांपर्यंत पोहोचवली. तर दुसरीकडे भारतासाठी रविचंद्रन अश्विन याने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. जडेजाने शुक्रवारी (10 मार्च) घेतलेल्या 6 विकेट्सच्या जोरावर काही महत्वाचे विक्रम नावावर केले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील ही बॉर्डर गावसकर कसोटी मालिका शेवटच्या टप्प्यात आहे. उभय संघांतील शेवटचा सामना गुरुवारी (9 मार्च) सुरू झाला. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 4 बाद 255 धावा केल्या. दुसऱ्या दिवशी उस्मान ख्वाजा आणि कॅमरून ग्रीन यांनी डावाची सुरुवात केली आणि संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिली. पाचव्या विकेटसाठी ग्रीन आणि ख्वाजामध्ये 208 धावांची भागीदारी झाली. ग्रीन रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याच्या चेंडूवर यष्टीरक्षक केएस भरतच्या हातात झेलबाद झाला आणि ऑस्ट्रेलियन संघाला गळती लागली. त्याव्यतिरिक्त अश्विनने ट्रेविस हेड, ऍलेक्स केरी, मिचेल स्टार्क, टॉड मर्फी आणि नेथन लायन या पाच विकेट्सही घेतल्या.
अश्विनने अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या दिवशी एक आणि दुसऱ्या दिवशी घेतलेल्या पच विकेट्सनंतर त्याने तीन महत्वाचे विक्रम नावावर केले. अश्विन या सामन्यानंतकर भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये मायदेशात सर्वाधिक पाच विकेट्स हॉल घेणारा गोलंदाज ठरला. अश्विनने याबाबतीत माजी दिग्गज अनिक कुंबळे यांना मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला. कुंबळेंनी कसोटी कारकिर्दीत 25 वेळा पाच विकेट्स हॉल घेतले होते. तर अश्विनने शुक्रवारी 26 व्या वेळी पाच विकेट्सचा हॉल घेतला.
तसेच या सहा विकेट्सच्या जोरावर अस्विन यावर्षीच्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत सर्वात जास्त विकेट्स घेणारा गोलंदाजही ठरला. अश्विनने यावर्षी या मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक 24 विकेट्स घेतल्या असून दुसऱ्या क्रमांकावर 22 विकेट्स घेणारा रविंद्र जडेजा होता. यादीत तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियन दिग्गज नेथन लायन आहे, ज्याने या मालिकेत 19 विकेट्स घेतल्या आहेत. त्याव्यतिरिक्त अश्विन बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या इतिहासात भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज देखील बनला. अश्विनने सर्वाधिक बॉर्डर गावसकर विकेट्सच्या बाबतीत अनिल कुंबळे यांनाच मागे टाकले. कुंबळेंनी त्यांच्या बॉर्डर गावसकर कारकिर्दीत एकूण 111 विकेट्स घेतल्या. तरु अश्विन मात्र 113 विकेट्सस यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला.
रविचंद्रन अश्विनने शुक्रवारी केलेले विक्रम
भारतील कसोटी सामन्यांमध्ये शर्वाधिक वेळा पाच विकेट्स हॉल घेणारा गोलंदाज
बॉर्डर गावसकर कसोटी मालिका 2023 मध्ये सर्वाधिक विकेट्स
बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा साकारल्या. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने नाबाद 36 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा 17, तर शुबमन गिल 18 धावांसह खेळपट्टीवर कायम आहेत. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहित आणि गिल भारताच्या डावाची सुरुवात करतील. ऑस्ट्रेलिया सध्या 444 धावांनी आघाडीवर आहे.
(Ravichandran Ashwin made this big record in the fourth Test against India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शतक ठोकल्यानंतर हरमनप्रीतवर आलेलं भयंकर संकट, थेट आई-वडिलांना येत होते कॉल्स; वाचा काय घडलेलं
आयपीएलमध्ये सर्वात जास्त रन्स करणाऱ्या दिग्गज खेळाडूचा क्रिकेटला अलविदा