भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने विश्वचषकात खेळल्या गेलेल्या पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात मोहम्मद नवाझ याच्या वाईड चेंडूबाबत एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले की, जर तो चेंडू वाईड गेला नसता, तर ड्रेसिंग रूममध्ये पळत जाऊन त्याने आपल्या कारकिर्दीबाबत एक मोठी घोषणा केली असती.
अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात भारतीय संघाला जेव्हा शेवटच्या दोन चेंडूत दोन धावांची गरज होती तेव्हा, दिनेश कार्तिक यष्टीचीत झाला. एका चेंडूत भारताला दोन धावांची गरज असताना रविचंद्रन अश्विन खेळपट्टीवर आलेला. अश्विनने चतुर बुद्धीमत्तेचं प्रदर्शन केलं आणि पायाच्या दिशेने जाणाऱ्या चेंडूशी छेडछाड न करता चेंडू तसाच जाऊ दिला. ज्यामुळे तो चेंडू वाईड घोषित करण्यात आला. त्याची अतिरीक्त धाव भारताला मिळाली. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर एक धाव काढत त्याने भारताला विजय मिळवून दिला.
जर तो चेंडू माझ्या पॅडवर लागला असता तर मी संन्यास घेतला असता- अश्विन
अश्विनने ज्या पद्धतीने नवाझचा चेंडू सोडत वाईडची एक धाव मिळवली, त्यासाठी त्याची पाठ थोपटली जात आहे. कारण यामुळेचं हा सामना बरोबरीवर येऊ शकला आणि भारतीय संघावरचा दबाव कमी झाला. ऋषिकेश कानिटकर यांच्याशी संवाद साधताना अश्विनने त्या वाईड चेंडूवर प्रतिक्रिया दिली. त्यात अश्विन म्हटला की, ”जर नवाझचा चेंडू फिरकी घेत माझ्या पॅडवर आदळला असता तर मी सरळ ड्रेसिंग रूममध्ये जाऊन ट्वीटरवर लिहिलं असतं की, खुप खुप धन्यवाद. माझी क्रिकेटची कारकिर्द शानदार राहिली. तुमच्या सर्वांचे आभार.”
अश्विनने याआधी आपल्या युट्यूब चॅनलवर सांगीतलेले की, त्या शेवटच्या चेंडूच्या वेळी मनात काय चालू होतं. युट्यूब चॅनलवरील संवादात तो म्हटला की,’ ‘ज्यावेळी मी पाहिलं की चेंडू लेग साईडला जातोय, त्यावेळी मी चेंडू सोडण्याचा निर्णय घेतला आणि तो चेंडू वाईड झाला. जेव्हा मला वाईड चेंडूची एक धाव मिळाली तेव्हा मी निश्चिंत झालो.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकातील सर्वात भारी व्हिडिओ, अर्धशतकवीर सूर्याला सेलिब्रेशन करण्यास विराटने पाडले भाग
VIDEO: सरकारही पडलं अन् ‘तोही’ झाला शांत, बांगलादेशच्या सलामीवीरांनी गपगुमान धरली तंबूची वाट