क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू असतात जे एखाद्या स्पर्धेत किंवा एखाद्या दौऱ्यावर खेळून आल्यानंतर काही काळासाठी विश्रांती घेतात. काही वेळेस ही विश्रांती खेळाडूंच्या स्वास्थासाठी आवश्यक असते. मात्र, या गोष्टीला भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन अपवाद ठरला आहे. आयपीएल २०२२मध्ये विशेष कामगिरी केल्यानंतर आणि सलग २ महिन्यांहून अधिक काळ सातत्याने क्रिकेट खेळल्यानंतर अश्विनला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी संघात सामील करण्यात आले आहे. मात्र, दौरा सुरू होण्यापूर्वीच्या काळात अश्विनने विश्रांतीला बगल देत क्लब क्रिकेटमध्ये खेळत सराव करण्याला प्राधान्य दिले आहे.
आयपीएलच्या व्यस्त हंगामानंतर रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) क्लब संघाकडून खेळण्यास सुरुवात केली आहे. भारताच्या या अनुभवी फिरकीपटूचे म्हणणे आहे की, १ जुलैपासून इंग्लंडविरुद्धच्या (England) ५व्या कसोटी सामन्यापूर्वी लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये स्वतःला जुळवून घेण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे.
He's got 654 Intl wickets and 3761 runs but that doesn't stop @ashwinravi99 from playing club cricket. 🙌#RoyalsFamily | #HallaBol pic.twitter.com/RLvkxGuKFI
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) June 8, 2022
भारतीय संघ (India) १५ जून रोजी एजबॅस्टन येथे लीसेस्टरशायरविरुद्ध सराव सामना खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. अश्विनने तमीळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या (Tamilnadu Cricket Association) प्रथम श्रेणी उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत ‘एमआरसी ए’ साठी खेळण्याचा निर्णय घेतला. उपांत्य फेरीत त्याने ८१ धावा केल्या आणि संघ अंतिम फेरीतही पोहोचला आहे. आयपीएलमध्ये तो अंतिम फेरीत पोहोचलेल्या राजस्थान रॉयल्स संघात होता.
इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी १ जुलैपासून होणार आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षी मालिकेत हा सामना खेळता आला नव्हता. या मालिकेत टीम इंडिया २-१ ने पुढे आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ लवकरच इंग्लंडला रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे. या सामन्यांत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल.
दरम्यान, भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अनिल कुंबळे नंतर अश्विन दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज बनला आहे. कुंबळेने त्याच्या कारकिर्दीत एकूण ६१९ बळी घेतले आहेत. तर अश्विन सध्या ४४२ बळी घेत कुंबळेचा विक्रम मोडण्याच्या प्रयत्नात आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दुसऱ्या सामन्यासाठी Cuttack शहरात पोहोचताच भारतासह दक्षिण आफ्रिकी खेळाडूंचे जंगी स्वागत, Video Viral
…म्हणून इशान किशन होता IPL 2022चा महागडा खेळाडू, बलाढ्य आयपीएल संघाच्या मेंटॉरनेच सांगितले कारण