टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन चेन्नई सुपर किंग्जमध्ये पुनरागमन करणार आहे. तो ‘इंडिया सिमेंट्स’सोबत जोडला जाणार आहे. रिपोर्ट्सनुसार, अश्विन चेन्नई सुपर किंग्जच्या हाय परफॉर्मन्स सेंटर मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यामुळे या चर्चांना वेग आला आहे की, तो पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जच्या टीममध्ये सामील होऊ शकतो.
रवीचंद्रन अश्विननं आपल्या आयपीएल करिअरची सुरुवात चेन्नई सुपर किंग्जकडूनच केली होती. त्यावेळी त्याला जगातील अनेक दिग्गज खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली होती. अश्विननं मुथय्या मुरलीधरन सारख्या महान फिरकीपटूसोबत ड्रेसिंग रुम शेअर केली होती, ज्याचा त्याला पुढे जाऊन खूप फायदा झाला. मात्र कालांतरानं, सीएसकेनं अश्विनला रिलिज केलं आणि तो आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांकडून खेळला.
आता आयपीएल 2025 पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. या दरम्यान अनेक खेळाडूंच्या संघात फेरबदल होईल. त्यापूर्वी अश्विनला पुन्हा एकदा ‘इंडिया सिमेंट्स’सह काम करण्याची संधी मिळाली आहे. अश्विन आता चेन्नई सुपर किंग्जच्या हाय परफॉर्मन्स सेंटरची कमान सांभाळेल. हे सेंटर चेन्नई शहराच्या बाहेर बनवण्यात आलं असून, ते आयपीएलच्या पुढील हंगामापूर्वी पूर्णपणे काम करायला सुरुवात लागेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
37 वर्षीय अश्विननं आयपीएलच्या 211 सामन्यांमध्ये 180 बळी घेतले आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 29.83 आणि इकॉनॉमी रेट 7.12 एवढा राहिला. 4/34 ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. रविचंद्रन अश्विन आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जशिवाय रायझिंग पुणे सुपरजायंट्स, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आहे. तो सध्या राजस्थान रॉयल्सचा भाग आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाच्या हेड कोचच्या शर्यतीत सौरव गांगुलीची एंट्री, स्वत:चंच नाव केलं पुढेॉ
वर्ल्डकप विजेत्या माजी क्रिकेटपटूचा लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय, तिसऱ्यांदा बनले खासदार
युरोपियन देशांविरुद्ध एकही टी20 सामना जिंकू शकले नाही! साहेबांच्या नावे लज्जास्पद विक्रम कायम