---Advertisement---

“मुंबई कोएत्झेवर तगडी बोली लावणार”, भारतीय दिग्गजाने केली भविष्यवाणी, कारणही सांगितले

---Advertisement---

आयपीएल 2024 च्या रिटेन्शननंतर आता सर्वांना आयपीएल लिलावाचे वेध लागले आहेत. दुबई येथे 19 डिसेंबर रोजी होणाऱ्या या मिनी लिलावात आणि किंवा खेळाडूंवर मोठी बोली लागू शकते. भारताचा प्रमुख फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने या लिलावात मुंबई इंडियन्स दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झे याला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करेल असे म्हटले.

आयपीएल रिटेन्शनमध्ये मुंबई इंडियन्सने आपल्या अनेक विदेशी वेगवान गोलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे त्यांना आता एका चांगल्या विदेशी वेगवान गोलंदाजाची आवश्यकता असेल. अशात त्यांची नजर कोएत्झे याच्यावर असेल. त्याबाबत बोलताना अश्विन आपल्या युट्युब चॅनलवर म्हणाला,

“गेराल्ड कोएत्झे हा मुंबई इंडियन्सच्या संघात शोभणारा खेळाडू आहे. मुंबईच्या निळ्या आणि सोनेरी जर्सीमध्ये तो चांगला वाटेल. वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी त्याला मदत करणारी आहे. त्यामुळे तो या संघाला फायदेशीर ठरेल. ते इतर खेळाडूंच्या बोल मध्ये उतरले नाही तर, शंभर टक्के कोएत्झेसाठी मोठी बोली लावतील.”

मुंबई इंडियन्सने कायम केलेले खेळाडू: रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, तिलक वर्मा, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, शम्स मुलानी, पियुष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, टीम डेव्हिड रोमारियो शेफर्ड (ट्रेड) व हार्दिक पंड्या (ट्रेड)

मुंबई इंडियन्सने करारमुक्त केलेले खेळाडू: जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, रायली मेरेडिथ, झाय रिचर्डसन, ख्रिस जॉर्डन, डुआन जेन्सन, अर्शद खान, रमनदिप सिंग, ऋतिक शौकीन, राघव जुयाल, संदीप वॉरियर व कॅमेरून ग्रीन (ट्रेड)

(Ravichandran Ashwin Said Gerald Coetzee Is Mumbai Indians Kind Of Player)

हेही वाचा-
मोठी बातमी! नामीबिया T20 World Cup 2024साठी क्वालिफाय, 19 संघ फिक्स; आता 1 जागेसाठी 3 संघात टक्कर
T20 World Cup: विराटच्या विक्रमाची बरोबरी करणारा डेरिंगबाज सिकंदर! हॅट्रिक घेत इतिहासही घडवला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---