जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताला 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. अंतिम सामन्यात भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर होता. अश्विनला खेळण्याची संधी न दिल्यामुळे संघ व्यवस्थापन आणि कर्णधारावार चांगल्याच टिका झाला. अजूनही चाहत्यांच्या मनातील रोष कमी झाला नाहीये. अशातच अश्विनने आता एक मुलाखत दिली असून त्यामध्ये त्याने अनेक मनातील गोष्टी बोलल्या आहेत.
अश्विनी भारतात परतल्यानंतर नुकतीच एक मुलाखत दिली. यामध्ये त्याने आपल्या कारकिर्दीपासून निवृत्तीपर्यंत अनेक गोष्टींवर मत व्यक्त केले. सध्याच्या संघाबाबतचे आपले मत व्यक्त करताना तो म्हणाला,
“आताच्या भारतीय संघात कोणी मित्र नाहीत. हे सर्व सहकारी आहेत. एक काळ असा होता जेव्हा संघातील सहकारी मित्र होते. हा खूप मोठा फरक आहे. आता इथे प्रत्येकाला स्वतःला पुढे जायचेय. त्यामुळे कोणाला विचारायला वेळ नाही की तू काय करतोय? हा एक एकाकी प्रवास आहे.”
याच मुलाखतीत बोलताना त्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्याची आपली इच्छा होती असे देखील म्हटले. मात्र, इंग्लंडमधील वातावरणामुळे हे शक्य झाले नाही असे देखील त्याने कबूल केले. तसेच, चांगला फलंदाज असताना देखील मी गोलंदाजीत कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला हे कुठेतरी शेवटी खटकेल, असे देखील तो म्हणाला.
अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा दुसरा सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाज आहे. अनिल कुंबळे यांच्या नंतर त्यानेच भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी घेतले आहेत. तसेच तो सध्या जागतिक कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी काबीज आहे.
(Ravichandran Ashwin Said No Friends In This Indian Team Said I Regreat Am Not Become Batter)
महत्वाच्या बातम्या –
‘बॅझबॉल’ स्टाइलने ऍशेसची सुरुवात! कमिन्सला पहिल्याच चेंडूवर दिला दणका, मागील वेळी झालेली वाताहात
हंगरगेकरची ‘ट्रिपल स्ट्राईक’! एकाच षटकात खेचले तीन गगनभेदी षटकार, व्हिडिओ पाहाच