इंडियन प्रीमियर लीग 2024 साठी सर्व संघांनी आपल्या रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या या याद्यांमुळे माध्यमांमध्ये बातम्यांचा अक्षरशः पूर आला आहे. अनेक दिग्गज आयपीएल फ्रँचायझी आणि त्यांनी निवडलेल्या संघाबाबत बोलत आहेत. पण अशातच अश्विनच्या हवाल्याने एक चुकीची माहिती समोर आली होती. स्वतः अश्विनने ही बातमी चुकीची असल्याचे स्पष्ट केले.
सोशल मीडियावर अनेकदा प्रतिष्ठित माध्यमे, पत्रकार आणि खेळाडूंच्या हवाल्याने चुकीची माहिती व्हायरल होत असते. पण बऱ्याचवेळा ज्या व्यक्तीच्या किंवा माध्यमाच्या हवाल्याने ही माहिती दिली जीते, त्यांना या संदर्भात कुठलीच खबर लागत नाही. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याचे नाव घेऊन अशीच एक चुकीची माहिती नेटकऱ्याने शेअर केली होती. पण स्वतः अश्विनच्या हे निदर्शनास आल्यानंतर भारतीय गोलंदाजाने या नेटकऱ्याला खडसावले आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट चांगलीच व्हायरल देखील झाली आहे.
भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) सोशल मीडियावर चांगलाच सिक्रिय आहे. अश्विनच्या नावाने चुकीची माहिती पसरवणारा नेटकरी देखील सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे. व्हायरल पोस्टमध्ये “संजू सॅमसन (Sanju Samson) याला चेन्नई सुपर किंग्जकडून कर्णधारपदासाठी प्रस्ताव आला होता. हा निर्णय जवळपास निश्चित झाला होता, पण सॅमसनने हा प्रस्ताव नाकारला,” असे लिहिले आहे. सोबत अश्विन आपल्या युट्यूब चॅनलवर हे म्हणाला, असे या नेटकऱ्याने पोस्टमध्ये लिहिले, जे पूर्णपणे चुकीचे आहे. ही पोस्ट अश्विनच्या निदर्शनास येताच त्याने या नेटकऱ्याला उत्तर दिले. “खोटी बातमी! माझ्या हवाल्याने खोटे बोलू नका ????,” असे अश्विन म्हणाला.
Fake news! Dont lie quoting me ????
— Ashwin ???????? (@ashwinravi99) November 29, 2023
दरम्यान, अश्विनने नुकतेच आयपीएल फ्रँचायझींनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंबाबत भाष्य केले. पंजाब किंग्जने शाकरूख खान याला रिलीज केले. पण अश्विनच्या मते शाहरुख लिलावात उतरल्यानंतर त्याला 12-13 कोटी रुपये मिळू शकतात. (Ravichandran Ashwin scolded the netizen for spreading fake news)
महत्वाच्या बातम्या –
IND vs AUS । ज्याच्यामुळे शतक वाया गेले, त्यालाच पाठीशी घातले! पाहा पराभवानंतर ऋतुराज काय म्हणाला
ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळी केलेल्या ऋतुराजबद्दल माजी दिग्गजाचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘उलट त्याला स्वातंत्र्य…’