भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज आर अश्विनला अत्यंत शांत आणि गंभीर क्रिकेटपटू म्हणून ओळखल जातं. त्याला पाहिल्यावर चाहत्यांना नेहमीच असं वाटत असेल, की तो कधी हसतो की नाही. पण कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे लॉकडाऊनदरम्यान सर्वांना अश्विनचा नवा चेहरा पाहायला मिळाला आहे.
आपल्या मुलाखतीदरम्यान अश्विनने (R Ashwin) आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याचे शीर्षक (कॅप्शन) तो स्वत: देण्यात अयशस्वी झाला आहे.
अश्विनने हा गमतीदार व्हिडिओ (Funny Vidoe) शेअर करत लिहिले, “यासाठी काय शीर्षक द्यावे? हे मला माहित नाही.” यामध्ये त्याने हसणाऱ्या चेहर्याचा एक इमोजीचाही समावेश केला आहे.
या व्हिडिओमध्ये एक परिसरातील मैदान दाखवले आहे. जिथे मुले क्रिकेट खेळत आहेत. पंचाने फलंदाजाला झेल बाद दिल्यानंतर फलंदाज डीआरएसची (DRS) मागणी करतो. यानंतर, खात्री करण्यासाठी शॉटचा रीप्ले दाखवण्यात आला आहे. जो आपले हसणे थांबविणार नाही. यानंतर अखेर पंच त्या फलंदाजाला नाबाद घोषित करतात.
https://www.instagram.com/p/CAzxfYBH0Nv/?utm_source=ig_web_copy_link
अश्विनचा हा व्हिडिओ क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड व्हायरल होत आहे. सुमारे अडीच लाख पेक्षाही अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-क्रिकेटपटूंकडे आहे वेळच वेळ, ‘या’ क्रिकेटपटूने नामी शक्कल लढवत घालवला असा वेळ
-रवी शास्त्रींनी शेअर केली अलिबागवरुन निसर्ग वादळाची तुफानी झलक, पहा व्हिडीओ
-एकाच दिवशी कसोटी व टी२० सामना होणार असले तर या पहा ११ खेळाडूंच्या दोन टीम इंडिया