---Advertisement---

ना नेहमीसारखे फोटो, ना मैदानावरचा जल्लोष; पुजारासोबत अश्विन, सिराजने केले विजयाचे ‘सुपरकूल सेलिब्रेशन’

Indian-players-celebration
---Advertisement---

भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारताने कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दक्षिण अफ्रिका दौऱ्याची (india tour of south africa) सुरुवात भारताने विजयासह केल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. पण दुसरीकडे चाहत्यांसोबतच भारतीय संघाचे खेळाडू देखील या विजयाने भारावून गेल्याचे दिसते. याच पार्श्वभूमीवर रविचंद्रन अश्विन (ravichandran ashwin) याने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.

सेंचुरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी दक्षिण अफ्रिका संघ १९१ धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने मालिकेतील पहिला विजय मिळवला. सेंचुरियनमध्ये भारताने पहिल्यांदाच कसोटी सामना जिंकल्यामुळे याला अधिक महत्व प्राप्त झाले. अशात भारतीय संघाचे खेळाडू देखील या विजयाचा पुरेपूर आनंद घेत असल्याचे दिसत आहे. भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून एक खास व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये खेळाडू डान्स करून विजयाचा अनंद घेत आहेत.

व्हिडिओ खेळाडूंच्या हॉटेलच्या बाहेरचा दिसत आहे, ज्याठिकाणी हॉटेलमधील स्टाफसोबत रविचंद्रन अश्विन, चेतेश्वर पुजारा आणि मोहम्मद सिराज डान्स करत आहेत. रविचंद्रन अश्विनने या व्हिडिओला एक खास कॅप्शन देखील दिले आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “सामना संपल्यानंतर काढला जाणारा नेहमीचा फोटो कंटाळवाणा झाला आहे, त्यामुळे चेतेश्वर पुजाराने मोहम्मद सिराजसोबत पहिल्यांदाच डान्स करून त्याला संस्मरणीय बनवण्याचा निर्णय घेतला. काय विजय होता.”

चाहते अश्विनने शेअर केलेल्या या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाइक्स देत आहेत. तसेच कमेंट्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. चाहत्यांना खेळाडूंची विजय साजरा करण्याची ही पद्धत खूपच आवडल्याचे दिसत आहे.

https://www.instagram.com/tv/CYG7s3FoG-U/?utm_source=ig_web_button_share_sheet

दरम्यान, दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या या पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने भारताला नाणेफेक जिंकवून दिली. प्रथम फलंदाजी करताना ३२७ धावा केल्या, प्रत्युत्तरात दक्षिण अफ्रिका संघ १९७ धावांवर सर्वबाद झाला. पहिल्या डावात आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात भारताचा संपूर्ण संघ १७४ धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेला विजयासाठी शेवटच्या डावात ३०५ धावांची आवश्यकता होती, पण अफ्रिकेला हे लक्ष्य गाठता आले नाही. शेटच्या डावात दक्षिण अफ्रिका अवघ्या १९१ धावांवर गुंडाळला गेला.

महत्वाच्या बातम्या –

Asia Cup: भारताची ‘यंगिस्तान’ पोहोचली अंतिम सामन्यात, उपांत्य सामन्यात बांगलादेशवर मिळवला सोपा विजय

प्रो कबड्डी २०२१: ‘यू मुंबां’चा ‘पिंक पँथर्स’ला पराभवाचा दणका, ३७-२८ च्या मोठ्या फरकाने जिंकला सामना

विषय आहे का? फक्त भारत नव्हे तर संपूर्ण आशियामध्ये ‘ही’ किमया साधणारा विराट बनला एकमेव कर्णधार

व्हिडिओ पाहा –

हे आहेत भारतीय गोलंदाज, पण फलंदाजी करताना कसोटीत केलंय शतक | Indian Bowlers Who Made Test Century

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---