नुकत्याच संपन्न झालेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी दमदार राहिली होती. सलग दहा सामने गमावल्यानंतर भारतीय संघाला अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले होते. या संपूर्ण स्पर्धेत भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने संघाला आक्रमक सुरुवातीला दिली. अंतिम सामन्यात देखील चांगली सुरुवात दिल्यानंतर तो बाद झाला होता. यामुळेच त्याच्यावर अनेक जण टीका करत आहेत. आता या टीकाकारांना भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने प्रत्युत्तर दिले आहे.
वनडे क्रिकेटमध्ये मोठ्या खेळ्या खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रोहितने या स्पर्धेत आक्रमक धोरण स्वीकारले होते. त्याने स्पर्धेत एक शतक व दोन अर्थशतके साजरी केली. त्याचवेळी तो तब्बल पाच वेळा चाळीशीत बाद झाला. अंतिम सामन्यात देखील केवळ 35 चेंडूंमध्ये 47 धावांची खेळी करून तो दहाव्या षटकात माघारी परतला. भारतीय संघाने सामना गमावल्यानंतर अनेक जण म्हणताना दिसले की, रोहित काही काळ खेळपट्टीवर उभा राहिला असता तर त्याने शतक केले असते व पर्यायाने भारत विजयी झाला असता. याच टीकेवर बोलताना अश्विन म्हणाला,
“शतके कशी ठोकायची हे रोहितला शिकवण्याची गरज नाही. त्याने आपल्या कारकिर्दीत बरीच शतके केली आहेत. त्याने या स्पर्धेत आक्रमक खेळण्याचा निर्धार केला होता. त्याने ज्या हेतूने फलंदाजी केली तो हेतू महत्त्वाचा होता.”
या स्पर्धेत रोहित शर्मा याने 11 सामन्यांमध्ये 54.37 च्या सरासरीने 597 धावा केल्या. यामध्ये त्याने 3 अर्धशतके व एक शतक केले. तसेच त्याचा स्ट्राईक रेट 125.94 इतका होता.
(Ravichandran Ashwin Slams Critics Who Talk About Rohit Sharma Approach)
हेही वाचा-
“मला माही भाईने सांगितले होते…”, नवा फिनिशर रिंकूने दिले धोनीला क्रेडिट
World Cup Final मध्ये ऑस्ट्रेलियाने केलेल्या हुशारीचा अश्विनकडून खुलासा, म्हणाला, “त्यांनी आयपीएल…”