fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

टिकटॉकवर आली बंदी आणि ऑस्ट्रेलियाच्या वॉर्नरचे झाले मोठे नुकसान, आश्विननेही घेतली मजा

मुंबई । भारताचा स्टार फिरकीपटू आर. अश्विन सोशल मीडियावर इतर खेळाडूंची मस्करी करण्याची कोणतीच संधी सोडत नाही. भारतात सोमवारी 59 चिनी अॅपवर बंदी घालण्यात आली. यातच आर. अश्विनला डेव्हिड वॉर्नरची मस्करी करण्याची संधी मिळाली.

कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट सामने होत नसल्याने ऑस्ट्रेलियाचा हा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नर आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहे. यासोबत तो आपला जास्तीत जास्त वेळ कुटुंबासह टीक टॉकवर डान्स बनवण्यात व्यस्त असल्याचं दिसून आला. भारतात त्याच्या व्हिडिओमुळे अनेक फॅन्स तयार झाले आहेत.

वॉर्नरने भारतीय फॅन्ससाठी हिंदी आणि साऊथ इंडियन गाण्यांवर डान्स करताना दिसून यायचा. भारतात टिक टॉक या अॅपवर बॅन घातल्यानंतर अश्विनने ट्विटरवर वॉर्नरची फिल्मी स्टाईलने मस्करी केली. वॉर्नरला टॅग करत लिहिले की, “अप्पो अनवर!” सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांच्या 1995 साली आलेल्या ‘माणिक भाषा’ या चित्रपटातला हा प्रसिद्ध डायलॉग आहे. याचा अर्थ असा की, आता डेविड वॉर्नर काय करायला जाणार आहे.

डेव्हिड वॉर्नरचे टिक टॅक व्हिडिओ भारतात खूपच प्रसिद्ध आहेत. शिल्पा शेट्टी, महेश बाबू सहित अनेक स्टार त्याचे फॅन झाले आहेत. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ म्हणाला की,”यावेळेस वॉर्नर व्यस्त आहे. डान्स करणे आणि इकडे तिकडे फिरण्यात बिझी आहे. त्याने भारतात एक वेगळे वातावरण तयार केले आहे.

सनरायझर्स हैदराबादचे मेंटर व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला की,“एक गोष्ट नक्की आहे की सनराइज हैदराबादचे चाहते त्याच्यावर खूपच खूश आहेत. वॉर्नरला भारतीय संघात निवडले जाणार नाही.मात्र, टॉलिवूडच्या चित्रपटात त्याला अभिनयाची संधी जरूर मिळेल यात कोणतीच शंका नाही.”

मागील काही दिवसात वॉर्नरने महेश बाबू यांच्या गाण्यावर डान्स करतानाचा एक व्हिडिओ बनवला होता. तसेच बाहुबली चित्रपटातला एक सीन देखील रीक्रिएट केला होता.

You might also like