भारतीय संघाला विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाकडून 6 विकेट्सने पराभूत व्हावे लागले. यामुळे ऑस्ट्रेलिया 6व्यांदा विश्वचषक विजेता बनला. या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रेविस हेड हा विजयाचा नायक ठरला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. आता याच निर्णयाबाबत भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने खुलासा केला आहे.
अंतिम सामन्यात भारतीय संघ विजयाचा दावेदार असताना देखील ऑस्ट्रेलियाने उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर विश्वविजेतेपद पटकावले. अंतिम सामन्याबाबतचा एक खुलासा करताना भारतीय संघाचा फिरकीपटू याने एका मुलाखतीत खुलासा केला. तो म्हणाला,
“भारतीय संघाचा डाव संपल्यानंतर मी ऑस्ट्रेलिया संघाचा डायरेक्टर जॉर्ज बेली याच्यासोबत बोललो. त्याला गोलंदाजीच्या निर्णयाबद्दल विचारले असता तो म्हणाला, इथे आम्ही आयपीएल व द्विपक्षीय मालिका भरपूर खेळलो आहोत. काळ्या मातीच्या खेळपट्टीवर दुपारच्या वेळी चेंडू चांगला स्पिन होतो याची आम्हाला कल्पना होती. तसेच येथे सायंकाळच्या सत्रात दव येत असल्याने फलंदाजीला फायदा होईल हे आम्हाला माहीत होते. याच अनुभवामुळे आम्ही असा निर्णय घेतला.
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने विराट कोहली व केएल राहुल यांच्या अर्धशतकांमुळे 241 धावा उभ्या केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 43 षटकातच सामना संपवला. भारतीय गोलंदाजांनी फक्त 47 धावांवर ऑस्ट्रेलियाच्या 3 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, त्यानंतर ट्रेविस हेड याने 137 धावांची शतकी खेळी व त्याला मार्नस लॅब्युशेन याने नाबाद अर्धशतक करून साथ दिल्याने ऑस्ट्रेलियाने सहा गडी राखून विजय मिळवला.
(Ravichandran Ashwin Speaks About Australia Plan In ODI World Cup Final)
हेही वाचा-
T20 World Cup 2024: पाकिस्तानी माजी कर्णधाराची काळजी तर पाहा; म्हणतोय, ‘रोहित-विराटला टी20 वर्ल्डकपमध्ये…’
सूर्यासोबत काय चर्चा करून इशानने ऑस्ट्रेलियन स्पिनरला दिला चोप? स्वत:च केला खुलासा; म्हणाला, ‘मला जोखिम…’
टीम इंडियातून बाहेर असलेल्या संजू सॅमसनचे धक्कादायक विधान; म्हणाला, ‘लोक मला सर्वात दुर्दैवी क्रिकेटर…’