बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात आजपासून (1 आॅगस्ट) सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या सत्रात 1 बाद 83 धावा केल्या आहेत.
इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडकडून सलामीवीर फलंदाज अॅलिस्टर कूक आणि केटन जेनिंग्जने सावध सुरुवात केली होती.
मात्र यानंतर कूकने लवकर विकेट गमावली. त्याला भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने नवव्या षचकात त्रिफळाचित केले. कूकने 28 चेंडूत 13 धावा करताना 2 चौकार मारले.
कूक बाद झाल्याने जेनिंग्जला साथ देण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा कर्णधार जो रुट आला. त्यानंतर मात्र रुट आणि जेनिंग्जने इंग्लंडचा डाव संभाळताना पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिले नाही.
पहिल्या सत्राच्या अखेरीस रुटने 63 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या आहेत. यात त्याने 4 चौकार मारले आहेत. तर जेनिंग्जने 77 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 38 धावा केल्या आहेत.
And, that's Lunch on Day 1 of the 1st Test.
England 83/1
Follow the game here – https://t.co/HeruIJq0DO#ENGvIND pic.twitter.com/fHoFvl2ASl
— BCCI (@BCCI) August 1, 2018
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–‘हा’ कारनामा करण्याची धमक फक्त टीम इंडियातच आहे
–पहिल्याच कसोटी सामन्यात आर अश्विनचा खास विक्रम
–पहा व्हिडीओ- या गोलंदाजाने टाकला जगातील सर्वात खराब चेंडू