सध्या तमिळनाडूमध्ये तमिळनाडू प्रीमियर लीग (TNPL 2023) स्पर्धेचा हंगाम खेळला जात आहे. टीएनपीएल ही भारतातील राज्य संघटनातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या टी20 लीगपैकी सर्वात प्रसिद्ध लीग मानली जाते. बुधवार (14 जून) स्पर्धेत डिंडीगुल ड्रॅगन्स विरुद्ध बी 11 सी त्रिची असा सामना खेळला गेला. या सामन्यात डिंडीगुल संघाचे नेतृत्व करत असलेल्या रविचंद्रन अश्विन याने केलेल्या एका कृतीमुळे चर्चेला उधाण आले आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अश्विनी याला जागा मिळाली नव्हती. इंग्लंडवरून परतल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये तो पुन्हा एकदा मैदानावर उतरला. डिंडीगुल ड्रॅगन्स संघाचे नेतृत्व करताना त्याने या सामन्यात दुसऱ्याच चेंडूवर बळी मिळवला. मात्र याच सामन्यात त्याने एक अशी गोष्ट केली, जी क्रिकेट जगतात कदाचित कधीही झालेली नव्हती.
Uno Reverse card in real life! Ashwin reviews a review ????
.
.#TNPLonFanCode pic.twitter.com/CkC8FOxKd9— FanCode (@FanCode) June 14, 2023
अश्विन टाकत असलेल्या तेराव्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्रिची संघाचा फलंदाज राजकुमार याच्या बॅटची कड घेतल्यानंतर यष्टीरक्षकाने झेल टिपला. खेळाडूंनी अपील केल्यानंतर पंचांनी त्याला बाद दिले. त्यावर राजकुमार याने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. तेव्हा पंचांनी त्याला नाबाद ठरवले. मात्र, यानंतर एक आश्चर्यकारक चित्र पाहायला मिळाले. अश्विनने किती वेळ या निर्णयाच्या विरोधात देखील तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, निर्णय बदलला नाही.
क्रिकेटच्या मैदानावर अशा अनेक गोष्टी करण्यासाठी अश्विन ओळखला जातो. क्रिकेटच्या सर्व नियमांचे ज्ञान असल्याने तो या गोष्टी करत असतो. या सामन्यातील त्याच्या गोलंदाजीचा विचार केला गेला तर, त्याने चार षटके गोलंदाजी करताना 26 धावा देत 2 बळी टिपले. या सामन्यात डिंडीगुल संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरला.
(Ravichandran Ashwin Took Review After After Third Umpires Decision In TNPL)
महत्वाच्या बातम्या –
“संजूने तीन संघांच्या कर्णधारपदाची ऑफर धुडकावली”, ‘त्या’ व्यक्तीचा मोठा खुलासा
‘इच्छा नसताना रोहितला कसोटी कर्णधार बनवलं गेलं…’, गांगुली आणि जय शहांनी केलेला आग्रह