मुंबई | आज ट्विटरवर भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हर्षल गिब्सला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गिब्स आज आपला ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे.
त्यामुळे या दोन खेळाडूंमधील वादावर अखेर पडदा पडला आहे.
आर. अश्विनने आज ट्विटर शुभेच्छा देताना म्हटले आहे की ‘वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा गिब्स’
Many more happy returns of the day to @hershybru , have a good one.
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) February 23, 2018
ट्विट केल्यानंतर ६ मिनीटात गिब्सने आर. अश्विनचे अाभार मानले.
https://twitter.com/hershybru/status/966978223635615744?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=https%3A%2F%2Fsports.ndtv.com%2Fcricket%2Fravichandran-ashwins-bonhomie-with-herschelle-gibbs-after-fixing-jibe-1816395
नक्की काय झाले होते आर. अश्विन आणि हर्शल गिब्जमध्ये-
अश्विनने नायकेच्या बुटांच्या प्रमोशनचा व्हिडीओ ट्विट केला होता.
Hey Guys! Just got my hands on the new NIKE React. It’s got a stunning design and the foam technology used makes it light and comfortable to use. Undoubtedly, the best running shoes I’ve stepped into, can’t wait to flaunt them.
#NikeReact #InstantGo #teamNike pic.twitter.com/SmspLkw2dA— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) February 19, 2018
अश्विनच्या ट्विटवर गिब्सने मजेशीर अर्थाने रिप्लाय दिला होता. यावर गिब्सने अश्विनला रिप्लाय दिला होता की, “आशा आहे की तू आता वेगाने धावू शकतो.”
https://twitter.com/hershybru/status/965515311834390528
या रिप्लायचे उपहासात्मक उत्तर देताना अश्विनने मात्र त्याला मॅच फिक्सिंगची आठवण करून दिली.
यावर अश्विनने २००० साली झालेल्या मॅच फिक्सिंगची आठवण करून देताना गिब्सला उत्तर दिले की, “नक्कीच तुझ्या इतका मी वेगवान नाही मित्रा. तुझ्याइतका मला वेग मिळालेला नाही. पण मला चांगले नैतिक विचार दिले आहेत की सामना फिक्स करून माझ्या ताटात अन्न येत नाही.”
२००० साली दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघातील काही सामने फिक्स झाले होते. या फिक्सिंग प्रकरणात दोन्ही संघाचे कर्णधार हँसी क्रोनिए आणि मोहम्मद अझरूद्दीन यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात अली होती. या प्रकरणात गिब्सचाही समावेश होता, त्यामुळे त्याच्यावर सहा महिन्याची बंदी आणि दंड करण्यात आला होता.
गिब्सने पुढे अश्विनला त्याने चुकीचा अर्थ घेतला असल्याचे सांगताना म्हणाला की “तू मस्करी म्हणून या गोष्टीला घेतले नाहीस. पण ठीक आहे आपण पुढे जाऊया.”
https://twitter.com/hershybru/status/965523683312795649?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=http%3A%2F%2Fmahasports.co.in%2Fr-ashwin-and-herschelle-gibbs-got-into-a-war-of-words-on-twitter%2F
यावर अश्विन म्हणाला, ” मी दिलेले उत्तरही मस्करीचं होती. पण तू आणि बाकी लोकांनी त्याचा वेगळा विचार केला. मी सुद्धा मस्करीचं करत होतो. आपण कधीतरी या विषयावर चर्चा करताना जेवण करू.”
I totally believed my reply was a joke too, but look how people and yourself perceived it. I am totally game for this sort of fun mate, we shall dine over this sometime.😂 https://t.co/Z7YdXQnxeD
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) February 19, 2018
काही वेळानंतर अश्विनने तो उपहासात्मक ट्विट डिलिट केला.