---Advertisement---

मोठ्या मनाचा अश्विन! विश्वचषक संघातून वगळूनही खचला नाही दिग्गज, ट्वीट करत म्हणाला…

Ravichandran Ashwin Ravindra Jadeja
---Advertisement---

विश्वचषक 2023 साठी भारताचा 15 सदस्यीय संघ घोषित झाला आहे. केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर या खेळाडूंना या संघात स्थान मिळवले आहे. पण काही खेळाडू असे आहेत, ज्यांना विश्वचषकासाठी संधी मिळाली नाहीये. रविचंद्रन अश्विन हादेखील विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर चर्चेत होता. पण त्यालाही निवडकर्ते आणि संघ व्यवस्तापनाने संघात घेतले नाहीये. अशात अश्विनचे एक ट्वीट चांगलेच चर्चेत आहे.

रविंचंद्रन अश्विन () भारताचा दिग्गज फिरकीपटू आहे आणि कारकिर्दीत आतापर्यंत त्याने 113 वनडे सामने खेळले आहेत. अशात वनडे विश्वचषकात देखील त्याची भूमिका संघासाठी महत्वाची ठरू शकत होती. पण याठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारकी आहे ती म्हणजे अश्विनने शेवटचा वनडे सामना मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात खेळला होता. जवळपास 18 महिन्यांपेक्षा अधिक काळापासून तो या फॉरमॅटमध्ये खेळला नाहीये. असात निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापन त्याला संघात घेऊन जोखीम पत्करताना दिसले नाहीत. आपल्याला विश्वचषकात संधी मिळणार नाही, याची कल्पना आधीच अश्विनला असू शकते. मागच्या काही दिवसांमध्ये तशा बातम्याही माद्यमांमध्ये समोर आल्या होत्या.

मंगळवारी संघ घोषित झाल्यानंतर फिरकीपटू गोलंदाजने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून पोस्ट केली. पण ही पोस्ट संघात घेतले नाही, यामुळे निराशा व्यक्त करणारी नव्हती. अश्विनने या पोस्टमधून मनाचा मोठेपणा दाखवता निवडलेल्या खेळाडूंना पाठिंबा दिला. त्याने लिहिले की, “चांगले प्रदर्शन करा! मायदेसातील विश्वचषका नेहमीच खास असतो. आपण सर्वांनी त्यांना (भारतीय संघातील खेळाडूंना) विश्वचषक जिकण्यासाठी पाठिंबा दिला पाहिजे.” अश्विनची ही पोस्ट पाहून अनेकजण त्याचे कौतुक करत आहेत. (Ravichandran Ashwin’s tweets after being dropped from World Cup 2023 squad)

विश्वचषकासाठी निवडलेला भारतीय संघ – 
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव , रवींद्र जडेजा, अक्षर पटेल.

महत्वाच्या बातम्या – 
नेमकं काय घडलं? पत्रकार परिषदेत रोहितला राग अनावर; स्पष्टच बोलला, ‘…मी उत्तर नाही देणार’
धक्कादायक! 15 सदस्यीय संघ घोषित करताच बसला झटका, ‘हा’ स्टार खेळाडू World Cupनंतर होणार निवृत्त

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---