ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतासाठी रविचंद्रन अश्विन याची भूमिका महत्वाची राहिली. अश्विनने या सामन्यात तीन महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला 400 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. अश्विनच्या कॅरम बॉलवर मार्नस लॅबुशेन ज्या पद्धतीने बाद झाला, त्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. अश्विनने हा चेंडू टाकण्यामागची विचारसरणी सांगितली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अश्विनच्या या चेंडूचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत स्वतः अश्विन या चेंडूविषयी बोलत आहे. मार्नस लॅबुशेन (Marnus Labuschagne ) ऑस्ट्रेलियासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. 31 चेंडूत वैयक्तिक 27 धावाची खेळी करून त्याने विकेट गमावली. ऑस्ट्रेलियाच्या डावातील 13व्या षटकात रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने त्याचा त्रिफळा उडवला. अश्विनच्या या चेंडूचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्वतः लॅबुशेन देखील विकेट कमावल्यानंतर थक्क झाला होता.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा सामना भारताने केएल राहुल याच्या नेतृत्वात जिंकला. सामना संपल्यानंतर अश्विनने आपल्या या खास चेंडूवर प्रतिक्रिया दिली. अश्विन म्हणाला की, “ऑस्ट्रेलियाला वेगाने धावा करणे गरजेचे होते. ऑस्ट्रेलियन गोलंदाज वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात होते. माझा प्रयत्न हाच होता की, माझी लाईन, लेंथ योग्य असावी सोबतच चेंडूत विविधता असावी. मार्नस लॅबुशेन माझ्या चेंडूवर सतत स्वीप मारण्याच्या प्रयत्न करत होता, हे मला जाणवले. त्यामुळे मी चेंडूच्या लाईन, लेंथ आणि वेरिएशन सतत बदलत होतो.”
????️ R Ashwin decodes THAT Marnus Labuschagne dismissal that has got everyone talking! ???? ???? – By @28anand #TeamIndia | #INDvAUS | @ashwinravi99 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/6j9x4iQlFh
— BCCI (@BCCI) September 25, 2023
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट्सच्या नुकसानावर 399 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ 28.2 षटकांमध्ये 217 धावा करू शकला. भारतासाठी या सामन्यात शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी वैयक्तिक शतके केली. केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी प्रत्येकी अर्धशतके केली होती. (Ravichandran Aswin reacts to the dismissal of Marnus Labuschagne)
महत्वाच्या बातम्या –
Asian Games । गोल्ड जिंकल्यानंतर स्मृती मंधानाला आली नीरज चोप्राची आठवण, वाचा काय म्हणाली स्टार फलंदाज
पैसाच पैसा! WPL मधून बीसीसीआयने केली चिक्कार कमाई, आकडा पाहून…