भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सुफडा साफ केला. दिल्ली कसोटीत भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू रवींद्र जडेजा याने झटपट विकेट्स काढत ऑस्ट्रेलियाला 113 धावांवरच रोखण्यात सिंहाचा वाटा उचलला. यादरम्यान जडेजाने सर्वाधिक विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत कुणालाही न जमलेली कामगिरी करून दाखवली. विशेष म्हणजे, या यादीतील तो एकमेव भारतीय गोलंदाज आहे. चला तर जाणून घेऊया जडेजाने नेमका काय विक्रम केला आहे.
जडेजाच्या 7 विकेट्स
भारताचा पहिला डाव 262वर रोखत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी त्यांच्या दुसऱ्या डावात 1 धावेच्या आघाडीसह खेळण्यास सुरुवात केली होती. त्यांना दुसऱ्या डावात फार चांगली कामगिरी करता आली नाही. त्यांच्या सलामीवीरांनी जरी चांगली सुरुवात करून दिली असली, तरीही मधल्या आणि तळातील फळी झटपट बाद झाली. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या 113 धावांवर संपुष्टात आला. अशाप्रकारे भारताला 115 धावांचे आव्हान मिळाले. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या डावात भारताकडून गोलंदाजी करताना रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने सर्वाधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली.
Just @imjadeja things 🫡🫡#INDvAUS pic.twitter.com/6wm0OeykQn
— BCCI (@BCCI) February 19, 2023
यावेळी ऑस्ट्रेलियाच्या 10 विकेट्समधील 7 विकेट्स या जडेजाने भारताकडून गोलंदाजी करताना दुसऱ्या डावात घेतल्या. जडेजाने उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, पीटर हँड्सकाँब, ऍलेक्स कॅरे, पॅट कमिन्स, नेथन लायन आणि मॅथ्यू कुह्नेमन यांच्या रूपात 7 विकेट्स नावावर केल्या.
Career-best Test figures for Ravindra Jadeja 🔥#WTC23 | #INDvAUS pic.twitter.com/ikHe85pfez
— ICC (@ICC) February 19, 2023
जडेजाचा विक्रम
यासह जडेजाच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. जडेजा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत सर्वोत्तम कामगिरी करणारा फिरकीपटू ठरला. त्याने 42 धावा खर्च करत 7 विकेट्स खिशात घातल्या. तसेच, यादीत अव्वलस्थान पटकावले. जडेजानंतर यादीत दुसऱ्या स्थानी पाकिस्तानचे माजी फिरकीपटू इकबाल कासिम आहेत. त्यांनी 1980मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 49 धावा खर्च करत 7 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, तिसऱ्या स्थानी श्रीलंकेचा माजी फिरकीपटू रंगना हेरथ असून त्याने 2016मध्ये कोलंबो येथे 64 धावा खर्च करत ऑस्ट्रेलियाच्या 7 फलंदाजांना तंबूत धाडले होते. (Ravindra Jadeja Best bowling figures by Asian left-arm spinners v Aus in Tests)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत आशियाई लेग स्पिनर्सची सर्वोत्तम कामगिरी
7/42- रवींद्र जडेजा (दिल्ली, 2023)*
7/49- इकबाल कासिम, (कराची, 1980)
7/64- रंगना हेरथ, (कोलंबो, 2016)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ माजी कर्णधाराच्या IPL कारकीर्दीला लागणार पूर्णविराम, सीएसकेच्या दिग्गजाची मोठी भविष्यवाणी
जन्मभूमी दिल्लीत विराट खेळतोय अखेरचा कसोटी सामना? फक्त दोन दिवस आणि वर्षभराची मेहनत पणाला