भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला तीन वनडे व दोन कसोटी सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. या मालिकांसाठी संघाची निवड देखील झाली असून, न्यूझीलंड दौऱ्यानंतर भारतीय संघ या ठिकाणी पोहोचेल. त्याचवेळी संघाचा अनुभवी अष्टपैलू रविंद्र जडेजा हा अद्याप दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्याने, या दौऱ्यावर जाण्याची शक्यता कमी आहे.
सध्या भारताचा सर्वात अनुभवी अष्टपैलू असलेल्या जडेजाला आशिया चषकानंतर दुखापत झाली होती. त्यामुळे तो टी20 विश्वचषकातही सहभागी झाला नव्हता. तसेच, शस्त्रक्रियेतून सावरण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी न्यूझीलंड दौऱ्यासाठी देखील त्याचा विचार झाला नाही. मात्र, बांगलादेश दौऱ्यासाठी त्याला निवडले गेले होते. मात्र, आता त्याचे पुनरागमन लांबण्याची शक्यता आहे.
एका प्रमुख क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार,
‘जडेजाला आशिया चषका दरम्यान दुखापत झालेली. त्यानंतर त्याच्यावर झालेली शस्त्रक्रियाही यशस्वीरित्या पार पडली. मात्र, तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. त्याने तंदुरुस्ती सिद्ध केली तरच तो बांगलादेश दौऱ्यावर जाऊ शकतो. अन्यथा त्याच्या जागी दुसऱ्या नावाचा विचार होईल.”
बांगलादेश दौऱ्यासाठी घोषित केलेल्या वनडे व कसोटी अशा दोन्ही संघात जडेजाचा समावेश आहे. त्याच्या अनुपस्थितीत कसोटी संघात वॉशिंग्टन सुंदर याची तर वनडे संघात शहाबाज अहमद याची वर्णी लागू शकते.
बांगलादेश दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.
बांगलादेश दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल.
(Ravindra Jadeja Doubtful For Bangladesh Tour Due To Fitness)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जुन्या निवड समिती बद्दल कार्तिकचे वक्तव्य; म्हणतोय,’त्यांनी खूप..’
‘आता पंतला हाकलण्याची वेळ आलीये’, रिषभच्या फ्लॉप प्रदर्शनानंतर चाहत्यांच्या तिखट प्रतिक्रिया