दिल्ली । आयसीसी अष्टपैलू क्रमवारीत दुसऱ्या तर गोलंदाजी क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असणाऱ्या रवींद्र जडेजाने एका फॅनवर ट्विटरच्या माध्यमातून जोरदार आगपाखड केली आहे. त्याला एका फॅनने दिल्ली कसोटीवेळी अजय जडेजा म्हणून हाक मारल्यामुळे त्याने ट्विटरच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे.
भारताकडून ३४ कसोटी, १३६ वनडे आणि ४० टी२० सामने खेळणाऱ्या जडेजाला चुकीच्या नावाने हाक मारल्यामुळे तो चांगलाच संतापला. संतापाच्या भारत फॅनच्या त्या कृत्याला तो मूर्खपणा आणि गावठी असेही म्हटला.
त्या फॅनने तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत रवींद्र जडेजाच्या कामगिरीचे जोरदार कौतुक केले. तसेच शेवटच्या सामन्यात तू चांगली गोलंदाजी केले असेही म्हटले. परंतु हे सांगताना त्याने वेल प्लेड अजय असे म्हटले.
जडेजा आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, ” एक चाहता मला भेटला आणि म्हटलं की मस्त खेळलास अजय. शेवटच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. मी ९वर्ष देशासाठी खेळतोय आणि तरीही लोकांना माझे नाव लक्षात राहत नाही. ??#मूर्खपणा #गावठी”
Someone came to me and said“well ball ajay. you bowled brilliantly in last match”.played 9 years of international cricket for country and still ppl dont remember my name.😡😡#stupidity #gavaar
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) December 8, 2017
जर आपणस माहित नसेल तर-
अजय जडेजा हा माजी क्रिकेटपटू असून त्याने भारताकडून १५ कसोटी आणि १९६ वनडे सामने खेळले आहे. सध्या जडेजा समालोचक म्हणून बऱ्याच वेळा समालोचन कक्षात दिसतो. जेव्हा अजय जडेजा क्रिकेट खेळत होता तेव्हा त्याचा मोठा चाहता वर्ग भारतात होता. जडेजाने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २००० साली खेळला आहे.
संघात सचिन, अझहर, सौरव गांगुली आणि राहुल द्राविड सारखे दिग्गज असतानाही अजय जडेजाचा खास चाहता वर्ग होता. गमतीचा भाग म्हणजे अजय जडेजा (२११) हा रवींद्र जडेजापेक्षा (२१०) भारतासाठी एक सामना जास्त खेळला आहे.