---Advertisement---

जडेजा रिटायर होणार! चालू सामन्यातच कारण आले समोर

---Advertisement---

आज (9 मार्च) आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीतील फायनल सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड संघ आमने-सामने आहेत. या सामन्यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल सामन्यानंतर रवींद्र जडेजा निवृत्त होऊ शकतो. (Ravindra Jadeja Retirement)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल सामन्यात असे संकेत मिळाले आहेत. खरेतर, जेव्हा रवींद्र जडेजाने त्याच्या स्पेलचे 10 षटके पूर्ण केली तेव्हा विराट कोहलीने (Virat Kohli) त्याला मिठी मारली. या क्षणाकडे पाहता, फायनल सामन्यानंतर जडेजा निवृत्तीची घोषणा करू शकतो अशी अटकळ बांधली जात आहे. जडेजाने आधीच टी20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. (Ravindra Jadeja Retire From T20 Cricket)

रवींद्र जडेजाच्या निवृत्तीबद्दल सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. भारतीय क्रिकेटमधील त्याच्या योगदानाबद्दल चाहते त्याचे आभार आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या फायनल सामन्यात जडेजाने 10 षटकांत फक्त 30 धावा दिल्या आणि 1 विकेटही घेतली. त्याने टॉम लॅथमला तंबूत पाठवले. 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जडेजा 4 सामन्यात फक्त 4 विकेट घेऊ शकला, तर फायनल सामन्यापूर्वी 2 डावात फलंदाजी करताना त्याने फक्त 18 धावा केल्या.

रवींद्र जडेजाने फेब्रुवारी 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. गेल्या 16 वर्षांत, जडेजा दीर्घकाळापासून आयसीसी क्रमवारीत जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल सामन्यापूर्वी त्याने 203 सामन्यांच्या वनडे कारकिर्दीत 2,797 धावा केल्या. जडेजाने आपल्या वनडे कारकिर्दीत 13 अर्धशतके झळकावली आहेत. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये 230 विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

कॅप्टन खवळला; ड्रिंक ब्रेक दरम्यान शुभमन गिलला भर मैदानात झापलं
न्यूझीलंडचा तुफान खेळ थांबवला भारतीय फिरकीपटूंनी; 26 चेंडूतच सामन्याचा रंग बदलला!
डोळ्याच्या पापण्या उघडेपर्यंत, रचीन रवींद्रचा स्टंप उडाला! कुलदीपचा स्वप्नपूर्ती चेंडू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---