भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख अष्टपैलू रवींद्र जडेजा आशिया चषकाच्या मध्यातूनच दुखापतीमुळे बाहेर झाला होता. साखळी फेरीत हॉंगकॉंगविरूद्धच्या सामन्यानंतर त्याच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झालेली. त्यानंतर तो टी20 विश्वचषकात खेळणार नाही अशा बातम्या देखील येत होत्या. या सर्व प्रकारादरम्यान आता जडेजाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली. जडेजाच्या दुखापतग्रस्त गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, ती यशस्वी झाली आहे. स्वतः जडेजाने सोशल मीडिया पोस्ट करत आपली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे सांगितले.
आशिया चषकातून बाहेर झाल्यानंतर जडेजा थेट शस्त्रक्रिया करण्यासाठी रवाना झाला होता. त्यानंतर आता सहाव्या दिवशीच त्याच्यावरील शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेनंतर जडजाने सोशल मीडियावर स्वतःची दोन छायाचित्रे प्रसिद्ध केली. यामध्ये एका तो बेडवर दिसतोय. तर, दुसऱ्या छायाचित्रात वॉकर घेऊन चालताना दिसला. त्याने या सोशल मीडिया पोस्टला कॅप्शन देत लिहिले,
https://www.instagram.com/p/CiKo5RTKakq/?igshid=MDJmNzVkMjY=
‘शस्त्रक्रिया यशस्वी झाली! असे खूप लोक आहेत ज्यांना धन्यवाद म्हणायचे आहे ज्यांचा या सर्वात सहभाग आणि मदत होती. बीसीसीआय, माझे सहकारी, डॉक्टर आणि सर्व चाहते. लवकरच मी रिहॅब सुरू करणार आहे आणि संघात परतण्याचा प्रयत्न करीन. मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांना पुनश्च धन्यवाद.’
जडेजा हा मागील काही काळापासून भारतासाठी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये चमकदार कामगिरी करत आहे. त्याने आशिया चषकातमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या अतिमहत्वाच्या सामन्यात विजयी खेळी केली होती. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत 29 चेंडूत 35 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने 120.69च्या स्ट्राईक रेटने 2 चौकार आणि 2 षटकार मारले होते. तर हाँगकाँग विरुद्ध त्याला फलंदाजीची संधी मिळाली नसली तरी त्याने गोलंदाजीत कमाल केली. त्याने 4 षटकात 3.75च्या इकोनॉमी रेटने गोलंदाजी करत 15 धावा दिल्या आणि एक विकेटही घेतली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
हार्दिकची धुलाई झाल्यावर माजी दिग्गजाला आठवला रविंद्र जडेजा, म्हणाला…
मुंबई इंडियन्सचा यष्टीरक्षक टी-20 विश्वचषकात घालणार राडा! बेबी एबीची संधी हुकली
दक्षिण आफ्रिकेने जाहीर केलाय टी-20 विश्वचषकाचा संघ, महत्वाच्या खेळाडूची कमी जाणवणार