भारतीय संघाचा खेळाडू रवींद्र जडेजा याची गणना जगातील सर्वोत्तम अष्टपैलूंमध्ये केली जाते. जडेजा शेवटचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना दिसला होता. या सामन्यात भारताचा 209 धावांनी दारुण पराभव झाला होता. या पराभवानंतर भारतीय संघ एक महिन्याच्या विश्रांतीवर आहे. यादरम्यान अनेक भारतीय खेळाडू परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. मात्र, जडेजा त्याचा मोकळा वेळ घोड्यासोबत घालवत आहे. सोशल मीडियावर रवींद्र जडेजाने घोड्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.
खरं तर, सोमवारी (दि. 19 जून) रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत जडेजा त्याच्या काळ्या घोड्यासोबत दिसत आहे. तसेच, एका फोटोत तो चारपाईवर बसल्याचे दिसत आहे. खरं तर, जडेजाला घोडेस्वारीची खूप आवड आहे. त्यामुळे त्याच्याकडे अनेक घोडे आहेत आणि हे सर्व त्याच्या फार्म हाऊसवर असतात.
जडेजा मागील अनेक काळापासून सातत्याने क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे तो त्याच्या घोड्याला वेळ देऊ शकत नाही. आता एक महिन्याची विश्रांती मिळाली असल्यामुळे त्याच्याकडे मोकळा वेळ आहे. अशात तो त्याचा अधिकतर वेळ फार्म हाऊसवर घालवत आहे. फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “फॉरएव्हर क्रश.”
Forever crush ❤️???? #meetingafterlongtime pic.twitter.com/NvrvZrqenV
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) June 18, 2023
जडेजाच्या या फोटोवर हजारो लाईक्स आणि शेकडो कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “भावा, घोड्याला जोरात पळायला शिकव.” खरं तर, जडेजाची गणना चपळ क्षेत्ररक्षकांमध्ये होते, त्याकडे पाहून चाहत्याने हे ट्वीट केले आहे.
Bhayi ghode ko tej bhagna sikha do
— JAY ???? (@galat_londey) June 18, 2023
आणखी एकाने कमेंट केली की, “घोडेजा इज बॅक.”
Ghodeja is back
— Rᴀɪᴋᴀᴛ (@ShortArmJab7) June 18, 2023
जडेजा जवळपास त्याच्या प्रत्येक पोस्टमध्ये राजपूतबॉय हॅशटॅगचा वापर करायचा. याविषयी एकाने कमेंट करत म्हटले की, “राजपूतबॉय लिहिणे का सोडले?”
#rajputboy क्यूँ लिखना छोड़ दिया आपने ???
— विनोद सिंह खारड़िया (@vinod_singh04) June 18, 2023
भारताचा वेस्ट इंडिज दौरा
डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी20 सामन्यांची मालिका खेळली जाईल. या दौऱ्याला 12 जुलैपासून सुरुवात होणार आहे. तसेच, या मालिकांसाठी 27 जून रोजी भारतीय संघाची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (ravindra jadeja posted photo with horse fans reaction viral read here)
महत्वाच्या बातम्या-
नाद केला पण पुरा केला! कसोटी क्रिकेटमध्ये 11168 धावा करून पहिल्यांदाच Stump Out झाला रूट, पण…
जोडी जबरदस्त! एकाच सामन्यात अँडरसन अन् ब्रॉडने रचला इतिहास, अनिल कुंबळेचा विक्रमही उद्ध्वस्त