भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून दुखापतीमुळे बाहेर झालेला भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा येत्या आयपीएल स्पर्धेतून क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणार आहे. सध्या दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर असलेला जडेजा सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव आहे.
तो सध्या सहकारी खेळाडूंच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करून पायखेची करत असतो. नुकताच राजस्थान रॉयल्स संघाच्या ट्विटर हँडलवर २०२५ मध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण असेल असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर जडेजाने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
https://www.instagram.com/p/CMMwYL_Kdyl/
आयपीएल स्पर्धेत रवींद्र जडेजा तंदुरुस्त होऊन चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. तत्पूर्वी राजस्थान रॉयल्स संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर प्रश्न विचारण्यात आला होता की,२०२५ मध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण असेल त्यावर जडेजाने स्वतःचेच नाव लिहिले आहे.
ही प्रतिक्रिया पाहून चाहत्यांना हसू आवरले नाही. रवींद्र जडेजाने दिलेल्या या प्रतिक्रियेनंतर राजस्थान रॉयल्सनेही त्याला प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिले की ‘अशाप्रकारे चर्चा थांबली’.
रवींद्र जडेजाची कामगिरी
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने भारतीय संघाच्या अनेक विजयांमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. त्याने आतापर्यंत भारतीय संघासाठी एकूण ५१ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने २२० गडी बाद केले आहेत. तसेच ३६.२ च्या सरासरीने १९५४ धावा देखील केल्या आहेत. यात १ शतक आणि १५ अर्धशतकांचा समावेश आहे.
वनडे क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने एकूण १६८ सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने एकूण २४११ धावा केल्या आहेत. तसेच १३ अर्धशतक देखील झळकवले आहेत. यासोबतच त्याने १८८ गडी देखील बाद केले आहेत. त्याने आतापर्यंत एकूण ५० टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने २१७ धावा केल्या आहेत आणि ४४ गडी देखील बाद केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ युवा भारतीय खेळाडूची गांगुलीने केली सेहवाग, युवराज आणि धोनी यांच्याशी तुलना
इंग्लंड विरुद्ध पहिल्या टी२० सामन्यासाठी अशी ‘या’ ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी