भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याच्या नावावर एक खास विक्रम नोंदवला गेला आहे. त्याने एशिया कप (Asia Cup) 2022च्या हंगामात रविवारी (28 ऑगस्ट) पाकिस्तान विरुद्ध मैदानात उतरताच क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये 100 किंवा 100 पेक्षा अधिक सामने खेळणारा पहिला भारतीय फलंदाज बनण्याचा विक्रम केला आहे. त्याच्या या 100व्या सामन्याबाबत एक योगायोग पाहायला मिळाला आहे. जेव्हा विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100वा सामना खेळतो तेव्हा त्या सामन्यात रविंद्र जडेजा चांगले प्रदर्शन करतो.
दुबईमध्ये झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) त्याचा 100वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला. या सामन्यात तो लयीत दिसला. तो केएल राहुल (KL Rahul) याची विकेट गेल्यावर सामन्याच्या तिसऱ्याच चेंडूवर फलंदाजी करायला आला. यावेळी त्याने 35 धावा केल्या. तर त्याच्या या विशेष सामन्यात पुन्हा एकदा रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) फॉर्ममध्ये दिसला.
विराटची 100वी वनडे आणि जडेजाने घेतल्या एवढ्या विकेट्स
विराटने त्याच्या वनडे कारकिर्दीतील 100वा सामना 2013मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध खेळला. द ओवलवर झालेल्या या सामन्यात कॅरेबियनच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 9 विकेट्स गमावत 233 धावा केल्या. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी केली. यावेळी जडेजाने 10 षटकात 36 धावा देत सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. हा सामना भारताने 8 विकेट्सने जिंकला. तर जडेजाच्या उत्तम कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
विराटची 100वी कसोटी आणि जडेजाचे दिडशतक
विराटच्या 100व्या कसोटीमध्येही जडेजाने उल्लेखनीय खेळी केली. 2022मध्ये भारतीय दौऱ्यावर आलेल्या श्रीलंका विरुद्धचा पहिला सामना मोहाली येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 574 धावांचा डोंगर उभारला होता. यावेळी जडेजाने नाबाद 175 धावा केल्या होत्या. तर याच सामन्यात त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्याने पहिल्या डावात 13 षटकाट 41 धावा देत 5 विकेट्स आणि दुसऱ्या षटकात 16 षटकात 46 धावा देत 4 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या या कामगिरीमुळे सामनावीराचा पुरस्कारदेखील मिळाला.
विराटचा 100वा टी20 सामना आणि पुन्हा एकदा जडेजाची विशेष कामगिरी
एशिया कप 2022मधील पाकिस्तान विरुद्धचा सामना विराटचा 100वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना ठरला. या सामन्यात जडेजाने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. त्याने 34 चेंडूत प्रत्येकी 2-2 चौकार आणि षटकार मारत 35 धावा केल्या. हा सामना भारताने 5 विकेट्सने जिंकला.
यामुळे विराटच्या वनडे, कसोटी आणि टी२०च्या प्रत्येक 100व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने विजयच मिळवला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्रर्र! आयसीसीच्या ‘या’ नव्या नियमामुळे पाकिस्तानला गमवावा लागला भारताविरुद्धचा सामना!
भारताविरुद्धचा पराभव माजी पाकिस्तानी दिग्गजाच्या जिव्हारी; म्हणाला, ‘आझमला कॅप्टन का बनवलंय’
हार्दिकच्या हृद्यात आहे माही! विजयानंतर धोनीला दिले आपल्या स्फोटक खेळीचे क्रेडिट